शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

युवा भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी

By admin | Updated: April 18, 2017 02:07 IST

आयपीएलचे दहावे सत्र सुरू होऊन दोन आठवडे झाले, पण अद्यापही कोणता संघ सर्वात पुढे जाईल हे आत्ताच सांगणे कठीण झाले आहे

अयाझ मेमन, संपादकीय सल्लागारआयपीएलचे दहावे सत्र सुरू होऊन दोन आठवडे झाले, पण अद्यापही कोणता संघ सर्वात पुढे जाईल हे आत्ताच सांगणे कठीण झाले आहे. पण गुणतालिका बघता मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स हे टॉप थ्रीमध्ये स्थान टिकवून आहेत. तर रायजिंग पुणे, गुजरात लायन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू हे शेवटच्या तीनमध्ये अडकून पडले आहेत. आजच्या घडीचा मर्यादित षटकांच्या सामन्यातील सर्वोत्कृष्ट समजल्या जाणाऱ्या विराट कोहलीचा आरसीबी संघ गुण तालिकेत तळाला आहे. त्यापाठोपाठ फलंदाजीची मजबूत फळी असणारा सुरेश रैनाचा गुजरातचा संघ शेवटून दोन नंबरवर आहे. त्यानंतर शेवटून तिसऱ्या क्रमांकावर नंबर लागतो तो रायजिंग पुणे संघाचा. या संघात महेंद्रसिंग धोनी, स्टिव्ह स्मिथ, बेन स्टोक्स, अजिंक्य रहाणे यासारखे दिग्गज खेळाडू असताना हा संघ फारशी चमकदार कामगिरी करू शकलेला नाही. याच्यावरून संघाचा बॅलन्स किती महत्त्वाचा आहे हे लक्षात येते. फक्त चांगले गोलंदाज आहेत पण फलंदाजी मजबूत नसेल तर विजय मिळणे कठीण जाते. तसेच तुमच्याकडे चांगले फलंदाज असतील आणि गोलंदाजांची वानवा असेल तर तुम्ही जिंकू शकत नाही. आपण पाहिले आहे की, विराट कोहली, ए.बी. डिव्हिलियर्स आणि शेन वॉटसन हे दोघे चांगले खेळत असूनही संघ जिंकू शकत नाही. आयपीएलमधील सगळे संघ जवळ जवळ समान पातळीवरचे आहेत. एखाद्या संघाला थोडा जरी फायदा मिळाला तर तो सामना आपल्या खिशात घालतो. मला यंदा दोन संघांनी सगळ्यात जास्त इम्प्रेस केले आहे, ते म्हणजे, मुंबई इंडियन्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स. मुंबईचे युवा खेळाडू चांगली कामगिरी करीत आहेत, तर दिल्लीचे सगळेच खेळाडू चमकदार परफॉर्मन्स देत आहेत. मॅक्सवेल, पोलार्ड, बेन स्टोक्स, डेव्हिड वॉर्नर यासारख्या परदेशी खेळाडूंनी आपआपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी केली आहे. भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर नजर टाकली असता मुंबई इंडियन्सच्या नितीश राणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आतापर्यंतच्या सर्व सामन्यात त्याने कामगिरीत सातत्य राखले आहे. तो बेडरपणे खेळतो, त्याच्या फटक्यांचे टायमिंग चांगले आहे. शिवाय फटक्यात ताकद असल्याने धावांची थैली भरत आहे. त्याच्याशिवाय हार्दिक आणि कुणाल पांड्या हे दोघेही मुंबईसाठी चांगला खेळ करीत आहेत. भारतीय गोलंदाजांचा विचार करता फिरकी गोलंदाज विशेषत: यजुवेंद्र चहल हा चांगली कामगिरी करीत आहे. भुवनेश्वर कुमारने दहा बळी मिळवून पर्पल कॅप मिळवली आहे. स्विंग हे त्याचे प्रमुख हत्यार आहे, तो इनस्विंग, आऊटस्विंग तर करतोच शिवाय तो लेट स्विंग करण्यात माहिर आहे. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याने आपली गती वाढवली आहे. त्यामुळे तो धोकादायक बनला आहे. आॅस्ट्रेलियाविरुध्दच्या मालिकेत चांगली कामगिरी करणारा उमेश यादवही चांगली गोलंदाजी करीत आहे. एकंदरीत अनेक भारतीय खेळाडूंना हे सत्र आतापर्यंत चांगले ठरले आहे. पण भारताचे कोहली, धोनी, रैना यांच्यासारखे स्टार खेळाडू पुढे जाऊन मॅचविनिंग परफॉर्मन्स करतात का याकडे सर्वांचे लक्ष आहे.