शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून युवा ‘टीम इंडिया’ची वर्ल्डकप तयारी

By admin | Updated: November 20, 2015 03:29 IST

येथे शुक्रवारपासून रंगणाऱ्या त्रिकोणीय मालिकेद्वारे भारताचा १९ वर्षांखालील क्रिकेट संघ आगामी १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या तयारीची सुरुवात करेल. २० ते २९ नोव्हेंबर

कोलकाता : येथे शुक्रवारपासून रंगणाऱ्या त्रिकोणीय मालिकेद्वारे भारताचा १९ वर्षांखालील क्रिकेट संघ आगामी १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या तयारीची सुरुवात करेल. २० ते २९ नोव्हेंबर दरम्यान साल्टलेक येथे पार पडणाऱ्या या त्रिकोणीय मालिकेत बांगलादेश व अफगाणिस्तान संघांचा सहभाग आहे.आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (आयसीसी) १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धा २२ जानेवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान बांगलादेशमध्ये रंगणार असून, भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया विजेतेपदासाठी लढेल. त्याचवेळी शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या त्रिकोणीय मालिकेद्वारे द्रविडसाठी संघातील कमजोरी व बलस्थाने जाणून घेण्याची सुवर्णसंधी मिळेल. या मालिकेतील सलामीचा सामना भारत विरुद्ध बांगलादेश, असा रंगेल.या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात अनेक प्रतिभावान खेळाडूंची संघात वर्णी लागली आहे. गतमहिन्यात झालेल्या १९ वर्षांखालील चॅलेंजर स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंडिया ब्ल्यूकडून खेळताना ११७ चेंडंूत १४२ धावांची तुफानी खेळी करणाऱ्या रिकी भुईकडे फलंदाजीची मुख्य जबाबदारी असेल. विशेष म्हणजे, चॅलेंजर स्पर्धेच्या कामगिरीनुसारच भारताच्या १९ वर्षांखालील संघाची घोषणा करण्यात आली. रिकी व्यतिरीक्त दिल्लीचा उदयोन्मुख यष्टिरक्षक - फलंदाज ॠषभ पंत आणि झारखंडच्या विराट सिंग यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. तसेच, मध्य प्रदेशचा मध्यमगती गोलंदाज अवेश खान, उत्तर प्रदेशचा शुभम मावी आणि फलंदाज अमनदीप खरे व अनमोलप्रीत सिंग यांचीही संघात निवड करण्यात आली आहे. तरी संघात सर्वांची नजर असेल ती सध्या उत्तर प्रदेशकडून रणजी खेळत असलेला मूळचा मुंबईकर खेळडू सरफराज खान याच्यावर. यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वांचे लक्ष वेधलेल्या या आक्रमक युवा खेळाडूकडे निर्णायक क्षणी सामना फिरवण्याची क्षमता आहे. दुसऱ्या बाजूला बांगलादेश संघाची धुरा अष्टपैलू मेहदी हसन मिराज याच्याकडे असून, संघाचा आत्मविश्वास सध्या वाढलेला आहे. आघाडीचा फलंदाज नजमुल हसन आणि सलामीवीर सय्यद हसन हेदेखील सध्या फॉर्ममध्ये आहेत. (वृत्तसंस्था)आयपीएलमध्ये राजस्थान संघासह मेंटरच्या रूपात काम केल्याचा निश्चित फायदा मिळाला आहे. मेंटर म्हणून मी २ वर्षे कार्य केले असून, या भूमिकेतून खेळाचे दुसरे रूपही पाहिले. त्याचप्रमाणे, माझे काम खेळाडूंना निवडणे नसून निवडलेल्या खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचे आहे. त्यांना पुढील स्तरावर खेळण्यासाठी सज्ज करण्याचे आव्हान माझ्यासमोर आहे.- राहुल द्रविड