शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

युवा खेळाडूंनी वेधले लक्ष

By admin | Updated: August 21, 2015 22:44 IST

स्टार स्पोर्ट्सच्या प्रो-कबड्डीचा दुसरा टप्पा अनेक अर्थांनी यशस्वी झाला. कामगिरी, प्रेक्षकांचा प्रतिसाद, मॅटवरील थरार यासारखी प्रत्येक बाब

गौतमी अरोसकर लिहितो...स्टार स्पोर्ट्सच्या प्रो-कबड्डीचा दुसरा टप्पा अनेक अर्थांनी यशस्वी झाला. कामगिरी, प्रेक्षकांचा प्रतिसाद, मॅटवरील थरार यासारखी प्रत्येक बाब पहिल्या टप्प्याच्या तुलनेत एक पाऊल पुढे असल्याचे निदर्शनास येते. यंदाच्या मोसमात युवा खेळाडूंची संख्या अधिक आहे, ही बाब माझ्यासाठी अधिक महत्त्वाची आहे. त्यात काही खेळाडूंनी माझे लक्ष वेधले असून या यादीमध्ये अग्रक्रमावर तेलुगू टायटनचा संदीप आहे. तो केवळ १८ वर्षांचा असून डावा कोपरा सांभाळतो. तो हरियाणाचा असून यंदाच्या मोसमात उत्तम बचावपटूंपैकी एक आहे. लीगनंतर त्याचा आत्मविश्वास अधिक उंचावला ही चांगली बाब आहे. पाटणा पायरेट््सचा गुरुविंदरसिंग दुसरा लक्षवेधी खेळाडू आहे. तो चढाई करणारा असून, चमकदार कामगिरीने त्याने सर्वांचे लक्ष वेधले. केवळ राकेशच्या अनुपस्थितीमुळे गुरुविंदरला संधी मिळाली आणि त्याने तिचे सोने करताना आज सर्वोत्तम चढाई करणारा खेळाडू म्हणून ओळख निर्माण केली. केवळ २० वर्षांचा असलेल्या गुरुविंदरचे भवितव्य उज्ज्वल आहे. बंगळुरू बुल्समध्ये केवळ १८ वर्षांचे दोन खेळाडू असून, आतापर्यंत त्यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. प्रदीप नरवाल आणि आशिष छोकर यांच्या जोडीमुळे बंगळुरूमध्ये असलेल्या गुणवत्तेची प्रचिती येते. संघाच्या यशात या युवा खेळाडूंचा वाटा महत्त्वाचा आहे. यू मुम्बाकडून खेळणारा कर्णधार अनूपचा भाऊ प्रदीपकुमार याचीसुद्धा कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. मुंबई संघाने यंदाच्या मोसमात लौकिकाला साजेशी कामगिरी करताना दखल घेण्यास भाग पाडले. दबंग दिल्लीचा रोहित कुमार चौधरी शानदार खेळाडू ,असून त्याने या मोसमाची चमकदार सुरुवात केली. स्पर्धेबाबत विचार करता, दिल्ली दबंगचा काशिलिंग अडके लीगमध्ये सर्वोत्तम चढाई करणारा खेळाडू भासत आहे. एका लढतीत त्याने चढाई करताना मिळविलेले २४ गुण हा या स्पर्धेचा आतापर्यंतचा उच्चांक आहे. छाप पाडणारा दुसरा खेळाडू यू मुम्बाचा रिशांक देवडिगा हा केवळ २१ वर्षांचा आहे; पण त्याने जबाबदारी स्वीकारताना अनूपला योग्य साथ देऊन चमकदार कामगिरी केली आहे. मुंबई संघ ‘करा अथवा मरा’ स्थितीत त्याचा चढाईपटू म्हणून वापर करतो हा या युवा खेळाडूसाठी मोठा बहुमान आहे. खेळातील डावपेच आणि नियम यांची सखोल माहिती असल्याची प्रचिती यंदाच्या स्पर्धेत येते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बराच बदल झाल्याचे निदर्शनास येते. बचावपटूंनी चांगली कामगिरी केल्यामुळे चढाई करणाऱ्या खेळाडूंना अधिक काळजी घ्यावी लागत आहे. ‘जिंकू किंवा मरू’ अशा आशयाच्या अनेक चढाया अनुभवायला मिळत आहेत.अखेर स्टार स्पोर्ट््सचे त्यांच्या अनोख्या ‘ले पंगा’ जाहिरातीबाबत कौतुक करायलाच पाहिजे, कारण त्यात काही तरी वेगळेपण आहे. ते कबड्डीशी निगडित असून युवकांना आकर्षित करणारे आहे. ‘पंगा’ हा शब्द युवा पिढीमध्ये चपखल बसतो आणि त्यामुळे या खेळातील जोश दिसून येतो. (टीसीएम)