शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

युवा भारतीय संघाचा तिरंगी विजय

By admin | Updated: November 30, 2015 00:56 IST

गोलंदाज मयंक डागर (३२ धावांत ३ बळी) याची सुरेख गोलंदाजी आणि सर्फराज खान (नाबाद ५९) याची जबरदस्त अर्धशतकी खेळी या बळावर भारतीय संघाने रविवारी

कोलकाता : गोलंदाज मयंक डागर (३२ धावांत ३ बळी) याची सुरेख गोलंदाजी आणि सर्फराज खान (नाबाद ५९) याची जबरदस्त अर्धशतकी खेळी या बळावर भारतीय संघाने रविवारी येथे बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात तब्बल २१९ चेंडू राखून सात विकेट्सने विजय मिळवताना विजेतेपद पटकावले.राहुल द्रविडच्या मार्गदर्शनात जबरदस्त कामगिरी करताना भारतीय संघाने प्रतिस्पर्धी बांगलादेशकडून मिळालेले ११७ धावांचे सहज लक्ष्य २१९ चेंडू बाकी असताना १३.३ षटकांत ३ गडी गमावून सहज पूर्ण केले आणि ही मालिका जिंकली. लक्ष्याचा पाठलाग करताना सर्फराज खान आणि कर्णधार रिकी भुई यांनी चौथ्या गड्यासाठी ७५ धावांची मॅचविनिंग भागीदारी केली.सर्फराजने २७ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ५९ धावा केल्या, तर रिकीने २0 चेंडूंत ४ चौकारांसह नाबाद २0 धावांचे योगदान दिले. त्याआधी सलामीवीर वॉशिंग्टन सुंदरने १२ व रिषभ पंतने २६ धावा केल्या. अमनदीप खरे शून्यावर बाद झाला. बांगलादेशकडून सईद सरकारने २३ व मेंहदी हसन व सालेह अहमद शावोन याने प्रत्येकी १ गडी बाद केला.त्याआधी बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला; परंतु भारतीय संघाच्या जबरदस्त गोलंदाजीसमोर यजमान संघ ३६.५ षटकांत फक्त ११६ धावांत गारद झाला. त्यांच्या चार फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही व एकूण सात फलंदाज दुहेरी आकडी धावसंख्याही पार करू शकले नाहीत.बांगलादेशकडून नजमुल हुसैन शांतो याने ६६ चेंडूंत ५ चौकार, एका षटकारासह सर्वाधिक ४५ धावांची खेळी केली. याशिवाय जयराज शेखने २८ व जाकर अलीने २४ धावा केल्या.भारताकडून डागरने ९ षटकांत ३२ धावा देत नजमल हुसैन (४५), मेहदी हसन (0) आणि मोहम्मद सैफद्दीन (0) यांना बाद केले. त्याला अन्य गोलंदाज शुभम मावी, महिपाल लोमरोर यांनी प्रत्येकी २ तर अवेश खान, खलील अहमद यांनी प्रत्येकी १ गडी बाद करीत साथ दिली. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलक : बांगलादेश : ३६.५ षटकांत सर्वबाद ११६. (नजमुल हुसैन ४५, जयराज शेख २८, जाकर अली २४. मयंक डागर ३/३२, महिपाल रोमरोर २/११, शुभम मावी २/२१).भारत : १३.३ षटकांत ३ बाद ११७. (सर्फराज नाबाद ५९, रिषभ पंत २६, रिकी भुई २0)द्रविड प्रशिक्षक असल्याचा विश्वास बसत नाही : सर्फराजभारताच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याविषयी पूर्ण श्रद्धा व्यक्त करताना उदयोन्मुख भारतीय फलंदाज सर्फराज खान याने त्याला हा माजी कर्णधार त्याचा प्रशिक्षक असल्याचा विश्वास बसत नसल्याचे म्हटले आहे.बांगलादेशात २२ जानेवारी ते १४ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या अंडर १९ वर्ल्डकपआधी द्रविडचा संघावर विशेष खोलवर प्रभाव पडला आहे. हा प्रभाव बांगलादेशविरुद्ध अंतिम सामन्यातील सामनावीर सर्फराज असो अथवा मालिकावीर रिषभ पंत. त्यांच्यासाठी द्रविड प्रशिक्षक असणे हे स्वप्न सत्यात उतरण्यासारखे आहे.सर्फराज म्हणाला, ‘‘आतापर्यंत मी त्यांना टीव्हीवर शतक झळकावताना पाहिले होते. ते आमचे प्रशिक्षक आहेत आणि आमच्या बरोबर आहेत यावर विश्वास बसणे माझ्यासाठी कठीण आहे. वर्ल्डकपच्या तयारीसाठी त्यांचा अनुभव महत्त्वाचा ठरेल असा मला पूर्ण विश्वास वाटतो. ते खूप शांतचित्त आहेत आणि हे त्यांच्यात विशेष आहे. त्यांनी कधीही मला मी धावा करीत नाही असे म्हटले नाही; परंतु प्रत्येक दिवशी शिकावे लागेल हे त्यांनी मला सांगितले. त्यांनी मला माझा नैसर्गिक खेळ करण्यास सांगितले. त्यांनी मला खूप मदत केली. मी त्यांचा ऋणी आहे.’’