शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

संयम दाखवावा लागेल

By admin | Updated: July 20, 2016 04:48 IST

भारतीय फलंदाज अजिंक्य रहाणे संथ खेळपट्ट्यांचे आव्हान पेलण्यासाठी सज्ज आहे.

अ‍ॅन्टिग्वा : विंडीजविरुद्ध दोन सराव सामन्यांत संथ खेळपट्ट्यांवर खेळावे लागल्यानंतर कसोटी मालिका संघाला अशाच प्रकारच्या खेळपट्ट्यांवर खेळावी लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत. भारतीय फलंदाज अजिंक्य रहाणे संथ खेळपट्ट्यांचे आव्हान पेलण्यासाठी सज्ज आहे. सराव सामने अनिर्णीत संपल्यानंतर भारतीय खेळाडूंनी सोमवारी नेटमध्ये कसून सराव केला. २१ जुलैपासून खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी अंतिम संघात कुणाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता आहे. सोमवारी सरावानंतर बोलताना रहाणे म्हणाला, ‘अ‍ॅन्टिग्वा येथील खेळपट्टी सराव सामन्याप्रमाणेच राहील असे वाटते. विंडीजमधील खेळपट्ट्या बऱ्याच अंशी भारतीय खेळपट्ट्यांप्रमाणे असतात. आम्ही बऱ्याच दिवसांपासून अशा प्रकारच्या खेळपट्ट्यांवर सराव करीत आहोत. यापूर्वीचा सराव सामना आम्ही अशाच प्रकारच्या खेळपट्टीवर खेळला आणि पहिला कसोटी सामनाही अशाच प्रकारच्या खेळपट्टीवर खेळला जाण्याची शक्यता आहे. संथ खेळपट्टीवर फलंदाजी करताना संयम राखणे महत्त्वाचे ठरते. धावा फटकावणे सोपे नसते. तळ ठोकून फलंदाजी केली तर धावा वसूल करता येतात. वेगवान गोलंदाजांना बळी घेण्यासाठी घाम गाळावा लागणार असून, फिरकी गोलंदाजांना महत्त्वाची भूमिका बजवावी लागणार आहे.’रहाणेने प्रशिक्षक कुंबळे यांची प्रशंसा करताना म्हटले की, ‘कुंबळे यांचा अनुभव संघासाठी उपयुक्त ठरेल.’ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेचा उल्लेख करताना रहाणे म्हणाला, येथील खेळपट्ट्यांवर २० बळी घेणे सोपे नाही. त्यासाठी गोलंदाजांना वेळ देणे आवश्यक आहे. संघाची फलंदाजीची बाजू मजबूत आहे.’विंडीज संघाबाबत बोलताना रहाणे म्हणाला, ‘प्रतिस्पर्धी संघाचा आदर करायला हवा. विंडीज संघात कार्लोस ब्रेथवेट, होल्डर, गॅब्रियल आणि बिशू यांच्यासारखे खेळाडू आहेत. त्यांचे गोलंदाजी आक्रमण आव्हानात्मक आहे. आम्हाला पूर्ण क्षमतेने खेळावे लागेल.’ (वृत्तसंस्था)>वेगवान गोलंदाजांसाठी येथे खेळणे आव्हान ठरणार आहे; पण सराव सामन्यांत आमच्या गोलंदाजांनी संयम दाखवला. ९० षटके दिशा व टप्पा अचूक राखणे गरजेचे आहे. गेल्या सराव सामन्यात अमित मिश्रा व रवींद्र जडेजा यांनी चांगली गोलंदाजी केली.- अजिंक्य रहाणे