शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

पहिल्याच लढतीत योगेश्वरचा पराभव

By admin | Updated: August 22, 2016 04:43 IST

कुस्तीमधील भारताच्या पदकाचे ज्यावर सर्वात जास्त आशा होत्या तो योगेश्वर दत्त प्राथमिक फेरीतच पराभूत झाल्याने भारतीयांना मोठा धक्का बसला.

शिवाजी गोरे,

रिओ : कुस्तीमधील भारताच्या पदकाचे ज्यावर सर्वात जास्त आशा होत्या तो योगेश्वर दत्त प्राथमिक फेरीतच पराभूत झाल्याने भारतीयांना मोठा धक्का बसला. पुरुषांच्या ६५ किग्रा वजनी गटाच्या कुस्ती स्पर्धेला सुरुहोताच भारतीयांच्या नजरा लंडन आॅलिम्पिकमधील कांस्य विजेता योगेश्वरकडे लागल्या होत्या. मात्र मंगोलियाच्या गंजोरिजिन मंदाखनारनविरुध्द एकतर्फी सामन्यात पराभूत झाल्याने भारतीयांच्या पदरी निराशा आली.या निराशानजनक पराभवानंतर भारताच्या पदकाच्या आशा आता पुर्णपणे मंदाखनारनच्या कामगिरीवर अवलंबून राहिल्या आहेत. जर, मंदाखनारन या गटाच्या अंतिम फेरीत पोहचला, तर योगेश्वरला कांस्य पदकाच्या लढतीत खेळण्याची संधी मिळेल. विशेष म्हणजे. मंदाखनारन २०१० आशियाई सुवर्णविजेता असून दोन वेळचा जागतिक अजिंक्यपद कांस्य विजेता आहे. त्यामुळे त्याच्याकडून अंतिम फेरीची अपेक्षा केली जात आहे.मंदाखनारन अंतिम फेरीत पोहचल्यास योगेश्वरला दोन रेपचेज फेऱ्या खेळावे लागतील. यानंतरच तो, कांस्य पदकाच्या प्ले आॅफमध्ये जागा निश्चित करु शकेल. हरियाणाचा हा ३३ वर्षीय मल्ल आपल्या कारकिर्दीतील चौथा आॅलिम्पिक खेळत असून त्याचीही जवळजवळ अखेरची आॅलिम्पिक आहे. अत्यंत एकतर्फी झालेल्या पहिल्या लढतीत योगेश्वरला मंदाखनारनने ३-० अशी धूळ चारली.या लढतीच्या सुरुवातीपासूनच मंदाखनारनवर पकड मिळवण्यात योगेश्वरला अपयश आले. मंदाखनारनच्या वेगवान हालचालींपुढे योगेश्वरचा काहीच निभाव लागला नाही. त्यातच, योगेश्वरच्या निराशाजनक कामगिरीचा फायदा घेत ३० सेकंदात एक गुण घेत मंदाखनारनने आपले खाते उघडले. यानंतर आक्रमक झालेल्या मंदाखनारने योगेश्वरला खाली पाडून वेगवान दोन गुणांची कमाई करुन मजबूत आघाडी घेतली.पहिल्या फेरीत अखेरचा एक मिनिट बाकी असताना योगेश्वरला पकड मिळवण्यात अपयश आल्याने विश्रांतीपर्यंत तो पिछाडीवर राहिला. गुडघ्याच्या दुखापतीतून सावरल्यानंतर रिओ पात्रता मिळवणाऱ्या योगेश्वरकडून दुसऱ्या फेरीत पुनरागमनाची अपेक्षा होती. मात्र, यामध्येही त्याला यश आले नाही. लढतीच्या अंतिम क्षणी त्याने मंदाखनारनला खाली पाडण्याचा अप्रतिम प्रयत्न केला. मात्र, यामध्येही त्याला यश मिळाले नाही.>...आणि पदकाचे स्वप्नही धुळीस मिळालेपहिल्या फेरीत मंदाखनारनविरुध्द पराभूत झाल्यानंतर योगेश्वरचे लक्ष रेपचेज फेरीकडे लागले होते. मात्र, यासाठी मंदाखनारन अंतिम फेरीत पोहचणे अनिवार्य होते. लंडन आॅलिम्पिकमध्येही योगेश्वरने कांस्य पटकावले होते. त्याचवेळी मंदाखनारन उपांत्यपुर्व फेरीपर्यंत पोहचण्यात यशस्वी ठरल्यानंतर योगेश्वरच्या आशा उंचावल्या होत्या. परंतु, याफेरीत २०१४ साली जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पटकावलेल्या रशियाच्या सोसलान लुडविकोविचविरुध्द एकतर्फी ०-६ असे पराभूत व्हावे लागले. त्यामुळे, मंदाखनारनच्या या पराभवाने योगेश्वरचे पदक मिळवण्याचे स्वप्नही धुळीस मिळाले. यासह सात सदस्यांच्या भारतीय कुस्ती संघाला साक्षी मलिकने पटकावलेल्या कांस्यच्या रुपाने केवळ एका पदकावर समाधान मानावे लागले.