मुंबई : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर छाप पाडलेल्या खेळाडूंचा समावेश असलेली महाराष्ट्राची मानाची पै. मुख्तार अहमद चषक महाराष्ट्र राज्य कॅरम स्पर्धा ४ ते ८ आॅगस्ट दरम्यान महाराष्ट्र व क्षात्रैक्य समाज वनमाळी सभागृह, दादर येथे रंगेल. १४ वे वर्ष असलेल्या या स्पर्धेत यावेळी १८ वर्षांखालील, १८ वर्षांवरील आणि ५० वर्षांवरील अशा तीन मुख्य गटात सामने रंगतील. यंदाचे वैशिष्ट म्हणजे यावर्षी स्पर्धेत विक्रमी ५०० खेळाडूंनी आपला सहभाग निश्चित केला आहे. कॅरम प्लेअर्स वेल्फेअर असोसिएशन, महाराष्ट्र आणि महाराष्ट्र क्षात्रैक्य समाज, दादर यांच्या संयुक्त विद्यमानाने होणाऱ्या या स्पर्धेत पुरुष एकेरी, महिला एकेरी, मुले एकेरी व मुली एकेरी (१८ वर्षांखालील), पुरुष एकेरी वयस्कर (५० वर्षांवरील) आणि पुरुष दुहेरी अशा सहा गटात लढती होतील. पुरुष एकेरीत एकूण २५६ खेळाडूंचा सहभाग निश्चित झाला असून पुण्याचा योगेश परदेशी आणि मुंबईचा रियाझ अकबर अली यांना अनुक्रमे प्रथम व द्वितीय मानांकन लाभले आहे. त्याचवेळी महिलांमध्ये स्नेहा मोरे व आयेशा मोहम्मद या मुंबईकरांना अनुक्रमे पहिले व दुसरे मानांकन मिळाले आहे.अखिल भारतीय कॅरम फेडरेशनच्या नव्या नियमांनूसार होणाऱ्या या स्पर्धेत राष्ट्रीय व माजी जागितक विजेता योगेश परदेशी, आयसीएफ चषक विजेता रियाज अकबर अली यांच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असेल. शिवाय आशियाई व राष्ट्रीय विजेता संदीप देवरुखकरसह नागसेन इटांबे देखील विजेतेपदासाठी कडवे आव्हान उभे करतील. त्याचवेळी महिलांमध्ये काजल कुमारी, अनुपमा केदार, संगीता चांदोरकर यांच्यात चुरस रंगेल. शिवाय रत्नागिरीची युवा मैत्रेयी गोगटेकडेही इतर खेळाडूंना विशेष लक्ष द्यावे लागेल.विजयी खेळाडूंना प्रमाणपत्रासह रोख पारितोषिक देण्यात येणार असून पहिल्या फेरीपासून ब्रेक-टू-फिनिश आणि ब्लॅक-टू फिनिश नोंदवणाऱ्या खेळाडंूना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. (क्रीडा प्रतिनिधी)>स्पर्धेतील गटवारी :पुरुष एकेरी :१. योगेश परदेशी (पुणे), २. रियाझ अकबर अली (मुंबई), ३. मंगेश पंडित (मुंबई), ४. प्रशांत मोरे (मुंबई), ५. राहुल सोळंकी (मुंबई).महिला एकेरी :१. स्नेहा मोरे (मुंबई), आयेशा मोहम्मद (मुंबई), ३. राधिका जोशी (ठाणे), ४. मैत्रेयी गोगटे (रत्नागिरी), ५. उर्मिला शेंडगे (मुंबई)>ज्युनिअर मुले (१८ वर्षांखालील):१. दीपक मारु (मुंबई), २. अथर्व बक्षी (पुणे), ३. शार्दुल पाटील (मुंबई), ४. सिध्दांत वडवळकर (मुंबई)ज्युनिअर मुली (१८ वर्षांखालील) :१. जान्हवी मोरे (ठाणे), २. पुष्करणी बठ्ठड (पुणे), ३. राधिका जोशी (ठाणे), ४. जान्हवी गोरे (ठाणे).
योगेश परदेशी व स्नेहा मोरे अग्रमानांकीत
By admin | Updated: August 2, 2016 04:25 IST