शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

यंदाच्या आयपीएलवर दुखापतीचे सावट

By admin | Updated: April 1, 2017 01:09 IST

भारताचा प्रमुख आॅफ स्पिनर आश्विनला पुन्हा एकदा हर्नियाचा त्रास उद््भवला आहे. त्यामुळे इंडियन प्रीमिअर लीगच्या

नवी दिल्ली : भारताचा प्रमुख आॅफ स्पिनर आश्विनला पुन्हा एकदा हर्नियाचा त्रास उद््भवला आहे. त्यामुळे इंडियन प्रीमिअर लीगच्या दहाव्या पर्वातून आश्विनने माघार घेतली आहे. आश्विन आयपीएलमध्ये रायजिंग पुणे सुपरजायन्ट््स संघातून खेळतो. अनेक भारतीय खेळाडू व्यस्त आंतरराष्ट्रीय कार्यक्रमानंतर आयपीएलच्या सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये खेळणार नसल्याचे चित्र आहे. सलामीवीर फलंदाज लोकेश राहुल (रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू) आणि मुरली विजय (किंग्स इलेव्हन पंजाब) या दोघांना खांद्याच्या दुखापतीने सतावले आहे. ते या स्पर्धेत खेळू शकणार नाही. कर्णधार विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू) व वेगवान गोलंदाज उमेश यादव (कोलकाता नाईट रायडर्स) आपापल्या फ्रॅन्चायझींकडून सुरुवातीचे काही सामने खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतीय संघाचा क्रिकेटच्या सर्वंच प्रकारात महत्त्वाचा सदस्य असलेला आश्विन १ जूनपासून प्रारंभ होणाऱ्या चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेपूर्वी तंदुरस्त होईल, अशी आशा आहे. ३० वर्षीय अष्टपैलू खेळाडूने यंदाच्या मोसमात मायदेशात खेळल्या गेलेल्या सर्व १३ कसोटी सामन्यांत प्रतिनिधित्व केले. त्याने जवळजवळ ७५० षटके गोलंदाजी केली. त्याने यंदाच्या मोसमात ८१ बळी घेतले. आरसीबीचे नेतृत्व ए. बी. डिव्हिलियर्सकडे बेंगळुरु : विराट कोहलीच्या खांद्याची दुखापत बरी न झाल्यास त्याच्या अनुपस्थितीत दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुचे नेतृत्व करेल. खांदेदुखीमुळेच फलंदाज लोकेश राहुल हा देखील खेळणार नाही. तो सर्जरीसाठी लंडनला रवाना होणार आहे. आॅस्ट्रेलियाविरुद्ध पुण्याच्या पहिल्या कसोटीत लोकेशला दुखापत झाली होती. पण दुखणे सांभाळून तो खेळत राहिला.विराटबाबत आरसीबीचे कोच डॅनियल व्हेट्टोरी म्हणाले, ‘सध्यातरी विराटच्या खेळण्याबद्दल स्पष्टता नाही. विराट बाहेर झाल्यास डिव्हिलियर्स नेतृत्व करेल. कोहली २ एप्रिलला संघात सहभागी होणार असून बीसीसीआयच्या फिजिओकडून त्याची उपलब्धता निश्चित होणार आहे.’विराट आणि राहुलच्या अनुपस्थितीत सर्फराज खान याला सुरुवातीच्या सामन्यात संधी मिळू शकते. याशिवाय राखीव बाकावर काही प्रतिभावान खेळाडू असल्याची माहिती देत व्हेट्टोरी पुढे म्हणाले, ‘मनदीपसिंग हा चांगला फलंदाज आहे. जवळपास १५ सामने खेळायचे असल्याने खेळाडूंना विश्रांती मिळण्याच्या हेतूने आम्ही वेळापत्रक तयार करीत आहोत. सर्वांना संधी मिळावी असा यामागील विचार आहे.