शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘विशेष’ खेळाडूंना डब्ल्यूडब्ल्यूईचा ‘खास’ पाठिंबा

By admin | Updated: July 18, 2015 00:33 IST

लॉस एंजेलिस (अमेरिका) येथे २५ जुलै ते २ आॅगस्ट दरम्यान पार पडणाऱ्या ‘स्पेशल आॅलिम्पिक्स वर्ल्ड गेम्स’ स्पर्धेसाठी भारताचा संघ सज्ज असून या स्पर्धेसाठी ‘वर्ल्ड रेसलिंग

मुंबई : लॉस एंजेलिस (अमेरिका) येथे २५ जुलै ते २ आॅगस्ट दरम्यान पार पडणाऱ्या ‘स्पेशल आॅलिम्पिक्स वर्ल्ड गेम्स’ स्पर्धेसाठी भारताचा संघ सज्ज असून या स्पर्धेसाठी ‘वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट’ने (डब्ल्यू.डब्ल्यू.ई.) भारतीय संघाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. या स्पर्धेत भारतीय संघ ‘स्पेशल आॅलिम्पिक्स भारत’ या नावाने सहभागी होणार असून शुक्रवारी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमामध्ये याबाबत माहिती देण्यात आली. २४ जुलैला रात्री भारतीय संघ लॉस एंजेलिसला रवान होणार आहे.‘स्पेशल आॅलिम्पिक्स भारत’चे राष्ट्रीय क्रीडा संचालक व्हीक्टर आर. वाझ व डब्ल्यूडब्ल्यूई इंडियाचे महाव्यवस्थापक रुकिन किझिबाश यांनी भारतीय संघातील निवडक खेळाडूंच्या उपस्थितीत स्पर्धेबाबत माहिती दिली. दरम्यान यावेळी आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते भारतीय संघाच्या जॅकेटचे अनावरण देखील झाले. यावेळी स्नेहा वर्मा, दिशा मारु (दोघेही स्विमिंग), नितीन सिंग, फातिमा रॉड्रिग्स (दोघेही बास्केटबॉल), प्रिया गडा (रोलर स्केटींग), मिहिर सोनी आणि विपुल जैन (दोघेही सॉफ्टबॉल) या खेळाडूंची उपस्थिती होती.एकूण १७० देशांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत भारताचा खेळाडू, प्रशिक्षक आणि अधिकारी असा एकूण ३२०हून अधिक सदस्यांचा मोठा चमू सहभागी होणार आहे. अ‍ॅथलेटीक्स, अ‍ॅकेवेटीक, बोक्के, बास्केटबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस, व्हॉलिबॉल, फुटबॉल, पॉवरलिफ्टींग, रोलर स्केटींग, हँडबॉल, सायकलिंग आणि गोल्फ या खेळांमद्ये भारताचे खेळाडू पदक मिळवण्यासाठी प्रयत्न करतील. या स्पर्धेत भारताकडे बलाढ्य प्रतिस्पर्धी म्हणून पाहिले जाते. २०११ साली झालेल्या गतस्पर्धेत १८४ खेळाडूंचा सहभाग असलेल्या भारताने तब्बल २४८ पदकांची लयलूट करताना ७८ सुवर्ण, ७७ रौप्य आणि ९३ कांस्य पदाकांचस कमाई केली होती. यामुळेचे भारताच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल.(क्रीडा प्रतिनिधी)