शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

पराभवानंतर WWE सुपरस्टार "अंडरटेकर"ने घेतली निवृत्ती

By admin | Updated: April 3, 2017 14:19 IST

90 च्या दशकातील लहानग्यांचा फेव्हरेट "डेडमॅन द अंडरटेकर"ने 27 वर्षांनंतर डब्ल्यूडब्ल्यूईला अलविदा म्हटलं

ऑनलाइन लोकमत
फ्लोरिडा, दि. 3 - 90 च्या दशकातील लहानग्यांचा फेव्हरेट "डेडमॅन द अंडरटेकर"ने 27 वर्षांनंतर डब्ल्यूडब्ल्यूईला अलविदा म्हटलं आहे. रेसलमेनिया 33 मधील  रोमन रेन्ससोबत झालेल्या सामन्यात हार पत्कारावी लागल्यानंतर अंडरटेकरने रेसलमेनियामधून निवृत्ती घेतली. 
 
रेसलमेनियाचा मेन इव्हेंट अंडरटेकर आणि रोमम रेन्स यांच्यादरम्यान झाला. रोमन रेन्सच्या  स्पीयर आणि सुपरमॅन पंचसमोर अंडरटेकर हतबल दिसला आणि त्याचा रेन्सने पराभव केला.  यापुर्वी रेसलमेनिया 30 मध्ये ब्रॉक लेस्नरने अंडरटेकरला हरवलं होतं. रेन्सकडून झालेला पराभव हा अंडरटेकरचा रेसलमेनियातील दुसरा पराभव ठरला. रेसलमेनियात त्याने केवळ 2 पराभवांचा सामना केला तर तब्बल 23 सामने जिंकले. 
 
मॅचनंतर अंडरटेकर रिंगमध्ये उभं राहण्याचा प्रय़त्न करत होता पण त्याची हालत नाजूक होती, चाहतेही अंडरटेकरच्या नावाने ओरडत होते, चाहत्यांच्या डोळ्यातही पाणी होतं.थोड्यावळाने अंडरटेकरने आपल्या हातातून ग्लव्स, कोट आणि टोपी उतरवून रिंगच्या मधोमध ठेवली. त्यामुळे डेडमॅनने संन्यास घेतल्याचं स्पष्ट झालं.
वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट द्वारा आयोजित रेसलमेनियाचा हा 33 वा इव्हेंट होता. अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये झालेल्या या इव्हेटंला 65 हजार लोकांनी लाईव्ह पाहिलं.  1990 मध्ये अंडरटेकर डब्लयूडब्लयूईमध्ये आला होता. 23 वेळेस रेसलमेनियाच्या रिंगमध्ये उतरून केवळ 2 वेळेस डेडमॅनला पराभवलाचा सामना करावा लागला.  
 
अंडरटेकरचं म्यूझिक वाजल्यानंतर संपूर्ण एरिनामध्ये काळोख पसरतो आणि अचानक डेडमॅन द अंडरटेकर रिंगमध्ये उभा दिसतो. इतकी वर्ष झाल्यानंतरही अंडरटेकरची ही एन्ट्री दर्शकांना खूप आवडायची.