शहरं
Join us  
Trending Stories
1
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
2
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
3
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
4
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
5
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
6
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
7
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
8
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
9
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
10
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
11
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
12
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
13
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
14
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती
15
कुलदीप यादवच्या डोक्यावर 'नंबर १'चा ताज; जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजांना टाकले मागे!
16
पल्सर की युनिकॉर्न? 'या' २ दमदार बाईक्समध्ये कोण आहे वरचढ? जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फीचर्स!
17
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या यशानंतर लक्ष्यला लागली मोठी लॉटरी, धर्मा प्रॉडक्शनचा चौथा सिनेमा केला साइन
18
Nashik Crime: 'कोणी लागत नाही नादी', पोलिसांना आव्हान माजी नगरसेवक पवन पवारविरोधात गुन्हा
19
ट्रम्प यांच्या भाषणावेळी इस्रायली संसदेत घोषणाबाजी, 'नरसंहार'चे पोस्टर फडकावले, गाझा समर्थक दोन खासदारांना बाहेर काढले
20
"अशांकडे ढुंकूनही पाहत नाही"; RSS वर बंदी घालण्याच्या खरगेंच्या मागणीवर CM फडणवीस थेटच बोलले...

नरसिंगलाच पाठवण्यावर कुस्ती महासंघ कायम

By admin | Updated: May 19, 2016 05:24 IST

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंग, सुशीलकुमार व नरसिंग यादव यांच्यात बुधवारी बैठक झाली.

नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिकसाठी ७४ किलो फ्री स्टाईल प्रकारात देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी कोणत्या मल्लाला पाठवायचे, याचा निर्णय घेण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंग, सुशीलकुमार व नरसिंग यादव यांच्यात बुधवारी बैठक झाली. बैठकीनंतर महासंघ आपल्या पहिल्याच निर्णयावर ठाम असल्याचे सांगून चाचणीसंदर्भातील आपली भूमिका २७ मे रोजी न्यायालयात मांडणार असल्याचे बृजभूषण सिंग यांनी सांगितले.कुस्ती महासंघाच्या दिल्ली येथील मुख्य कार्यालयात दीड तास ही बैठक चालली. बैठकीत कुस्ती महासंघाचे सचिव व्ही.एन. प्रसून, वरिष्ठ उपाध्यक्ष आय.डी. नानावटी, मुख्य प्रशिक्षक जगमिंदर व सुशीलकुमारचे प्रशिक्षक गुरू सतपाल उपस्थित होते. ज्या कुस्तीपटूने आॅलिम्पिक कोटा मिळवला आहे, त्यालाच आॅलिम्पिकला पाठवण्याच्या आपल्या पूर्वीच्या निर्णयावर कुस्ती महासंघाने ठाम राहायचा निर्णय घेतला आहे.या बैठकीनंतर बृजभूषण सिंग म्हणाले, ‘सुशीलकुमारने आमच्यासमोर त्याची बाजू मांडली. आम्ही त्याची बाजू लक्षपूर्वक ऐकून घेतली. मी स्वत: त्याला म्हणालो की, तू माझ्या जागी असता तर काय केले असते? सुशीलकुमार देशातील मोठा कुस्तीपटू आहे. त्याने दिलेल्या योगदानाला कोणीही नाकारणार नाही. मात्र, दुसरीकडे नरसिंगने सातत्याने चांगली कामगिरी केलेली आहे. त्याने देशाला आॅलिम्पिकसाठीचा कोटा मिळवून दिला आहे. त्यामुुळे त्याच्यावर आम्ही अन्याय करू शकत नाही.’ चाचणीसंदर्भात ते म्हणाले, ‘आम्ही पूर्वीच्याच भूमिकेवर ठाम असून याबाबतची भूमिका आम्ही २७ मे रोजी न्यायालयात मांडू. चाचणीसंदर्भात आता काहीच सांगता येणार नाही.’>चाचणीसाठी तयार नाहीबृजभूषण सिंग यांनी चाचणीला तयार नसल्याचेच संकेत याद्वारे दिले. ते म्हणाले, ‘कुस्ती महासंघ कोणत्याही एका व्यक्तीसाठी काम करत नाही. मी कधीही सुशीलला चाचणीसाठी शब्द दिलेला नाही. नरसिंगने सातत्याने चांगली कामगिरी केलेली असल्याने त्याच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. सुशीलने बैठकीत चाचणीचा मुद्दा उपस्थित केलेला. आता आम्हाला आमची भूमिका न्यायालयात मांडायची आहे.