शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

...तर सचिनची संघातून हकालपट्टी झाली असती!

By admin | Updated: September 22, 2016 19:44 IST

२०१२ मध्ये वन डे संघातून सचिन तेंडुलकरने स्वत:हून निवृत्ती घेतली अन इज्जत शाबूत ठेवली. अन्यथा त्याची हकालपट्टी अटळ होती.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. २२ : २०१२ मध्ये वन डे संघातून सचिन तेंडुलकरने स्वत:हून निवृत्ती घेतली अन इज्जत शाबूत ठेवली. अन्यथा त्याची हकालपट्टी अटळ  होती. टीम इंडियाचे माजी निवडकर्ते संदीप पाटील यांनी गुरुवारी हा गौप्यस्फोट केला.सचिन २०१२ मध्ये वन डेतून आणि २०१३ मध्ये २०० वी कसोटी खेळल्यानंतर कसोटी क्रिकेटमधून देखील निवृत्त झाला. कारकीर्दीच्या अखेरच्या टप्प्यात सचिनची संघातील अवस्था जागा अडविणारा खेळाडू अशी झाली होती. त्याने २०१२ मध्ये निवृत्ती घेतली नसती तर हकालपट्टी करण्यासाठी निवडकर्ते तयार होते, असे पाटील यांनी एका मराठी वाहिनीशी बोलताना सांगितले.

राष्ट्रीय निवड समिती प्रमुख म्हणून कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर पाटील पुढे म्हणाले,ह्य१२ डिसेंबर २०१२ ला नागपुरात इंग्लंडविरुद्ध कसोटी खेळली जात असताना तत्कालीन निवडकर्त्यांनी त्याची भेट घेतली. सचिनला त्याच्या भविष्यातील योजनांबद्दल विचारले तेव्हा मी निवृत्ती वैगरे घेणार नसल्याचे त्याने स्पष्ट केले. पण निवड समितीने सचिनला बाहेर करण्याचा निर्णय घेत बोर्डाला तसे सूचित केले होते. भविष्यात काय वाढून ठेवले आहे, हे सचिनला कळले असावे. आमची पुढची बैठक झाली तेव्हा वन डेतून निवृत्त होणार असल्याचे सचिनने आम्हाला कळविले. त्याने हा निर्णय घेतला नसता तर त्याची हकालपट्टी अटळ होती.

कसोटीवर लक्ष केंद्रित करण्याचा सचिनचा विचार असावा. त्याने मला आणि संजय जगदळे यांना फोन केला. ४६३ वन डे (४६ शतकांसह १८४२६ धावा) खेळल्यानंतर २३ डिसेंबर २०१२ ला निवृत्ती जाहीर केली. वर्षभरानंतर कसोटीतून निवृत्ती घेण्यासाठी सचिनला बाध्य करण्यात आले. हा खुलासा देखील संदीप पाटील यांनी केला. सचिनच्या निवृत्तीसाठी दोन सामन्यांची कसोटी मालिका बोर्डाच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आली. २०० कसोटीत ५१ शतकांसह १५९२१ धावा काढणारा हा खेळाडू १६ नोव्हेंबर २०१३ रोजी निवृत्त झाला. आपल्या कार्यकाळात काही गोष्टी मनाविरुद्ध घडल्याची खंत देखील पाटील यांनी व्यक्त केली