शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

विश्व कुस्ती स्पर्धा : साक्षी मलिक, विनेश फोगाट यांनी केले निराश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 03:19 IST

पॅरिस : आॅलिम्पिक कांस्य विजेती साक्षी मलिक विश्व कुस्ती स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभूत होऊन बाहेर पडली. विनेश फोगाटला देखील उपउपांत्यपूर्व फेरीचा अडथळा दूर करण्यात अपयश येताच, या स्पर्धेत भारतीय खेळाडूंची खराब कामगिरी गुरुवारीदेखील कायम राहिली.पहिल्या तीन दिवसांच्या खराब कामगिरीनंतर सर्वांच्या नजरा होत्या त्या साक्षी आणि विनेश यांच्या कामगिरीवरच. पण दोघीही ...

पॅरिस : आॅलिम्पिक कांस्य विजेती साक्षी मलिक विश्व कुस्ती स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभूत होऊन बाहेर पडली. विनेश फोगाटला देखील उपउपांत्यपूर्व फेरीचा अडथळा दूर करण्यात अपयश येताच, या स्पर्धेत भारतीय खेळाडूंची खराब कामगिरी गुरुवारीदेखील कायम राहिली.पहिल्या तीन दिवसांच्या खराब कामगिरीनंतर सर्वांच्या नजरा होत्या त्या साक्षी आणि विनेश यांच्या कामगिरीवरच. पण दोघीही अपेक्षेनुरूप खेळ करण्यात अपयशी ठरल्या. साक्षीला ६० किलो गटात जर्मनीची लुईसा नीमेस्च हिने लोळविले. दोनवेळेची ज्युनियर विश्व चॅम्पियन अमेरिकेची व्हिक्टोरिया अ‍ॅन्थोनी हिने ४८ किलो गटात विनेशला चितपट केले. रिओ आॅलिम्पिकमधीलअपयशाची भरपाई करण्यासाठी आलेल्या विनेशसाठी हा धक्कादायक पराभव ठरला. याआधी विनेशने पात्रता फेरीत युक्रेनची ओकसाना लिवाच हिला नमविले होते. भारताच्या अन्य दोन मल्ल शीतल तोमर (५३ किलो) आणि नवज्योत कौर (६९ किलो) यांनादेखील पराभवाचे तोंड पाहावे लागले. नवज्योतला मंगोलियाची ओचिरबात नसानबुर्मा हिच्याकडून ५-१० अशा गुणफरकाने पराभव पत्करावा लागला. नवखी मल्ल शीतलने विजयी सुरुवात केली. तिने आॅस्ट्रेलियाची जेसिका मॅकबेन हिच्यावर १०-० ने मात केली. पण कामगिरीत सातत्याअभावी पुढच्या फेरीत रोमानियाची इस्तारा डोब्रे हिच्याकडून तिचा २-४ ने पराभव झाला.रिओ आॅलिम्पिकचे कांस्य विजेती पहिली महिला मल्ल साक्षीने घोर निराशा केली. आपल्यापेक्षा कमी रँकिंग असलेल्या खेळाडूला आव्हान देऊ शकली नाही. साक्षीने ६० किलो गटात आशियाई चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकले होते. विश्व स्पर्धेत आता भारताच्या आशा पुरुष फ्री स्टाईल मल्लांवर असेल. त्यात आशियाई चॅम्पियन बजरंग पुनिया (६५ किलो) आणि आॅलिम्पियन संदीप तोमर (५७ किलो) हे पदकाचे दावेदार मानले जातात.(वृत्तसंस्था)