शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

भारतीय महिलांना वर्ल्डकपचे ‘तिकीट’

By admin | Updated: February 18, 2017 01:18 IST

कर्णधार मिताली राज आणि सलामीची फलंदाज मोना मेश्राम यांची बॅट आज पुन्हा तळपली. या दोघींच्या शानदार खेळीच्या बळावर भारतीय महिला

कोलंबो : कर्णधार मिताली राज आणि सलामीची फलंदाज मोना मेश्राम यांची बॅट आज पुन्हा तळपली. या दोघींच्या शानदार खेळीच्या बळावर भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक पात्रता फेरीच्या सुपरसिक्स लढतीत बांगला देशचा ९९ चेंडू आधीच नऊ गड्यांनी पराभव करीत मुख्य फेरी गाठली. महिला विश्वचषकाचे आयोजन इंग्लंडमध्ये २४ जून ते २३ जुलै या कालावधीत होणार आहे.भारताची कर्णधार मिताली राजने बांगलादेशला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भेदक माऱ्याच्या बळावर भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशला ५० षटकांत ८ बाद १५५ धावांवर रोखले. फरजाना हक (५०) आणि शमीन अख्तर (३५) यांचा अपवाद वगळता अन्य फलंदाज धावा काढण्यात अपयशी ठरले. भारताकडून मध्यम जलद गोलंदाज मानसी जोशीने २५ धावांत तीन आणि देविका वैद्यने १७ धावांत दोन गडी बाद केले.मितालीने नाबाद ७३ आणि मोना मेश्रामने नाबाद ७८ धावा ठोकून दुसऱ्या गड्यासाठी १३६ धावांची भागीदारी करताच ३३.३ षटकांत एक बाद १५८ धावांवर विजय साकार झाला. त्याआधी दीप्ती शर्मा (२२ चेंडूत १ धाव) नवव्या षटकांत बाद झाली. मितालीने ८७ चेंडू टोलवित दहा चौकार आणि एक षट्कार मारला. मोनाने ९२ चेंडूंत १२ चौकार ठोकले. साखळीत सर्वच सामने जिंकणाऱ्या भारतीय संघाचे सुपरसिक्समध्ये चार सामन्यांतून आठ गुण झाले. त्यामुळे अंतिम फेरीतील स्थान निश्चित झाले आहे. (वृत्तसंस्था)भारताप्रमाणे दक्षिण आफ्रिका देखील पात्रता गाठण्यात यशस्वी ठरला. आफ्रिकेने श्रीलंकेवर ८३ चेंडू शिल्लक राखून ९ गड्यांनी विजय साजरा केला. आफ्रिका संघाचे सहा गुण झाले झाले. साखळी फेरीत अपराजित राहिल्यानंतर हा संघ सुपरसिक्समध्ये भारताकडून पराभूत झाला होता. लंकेने प्रथम फलंदाजी करीत ९ बाद १४५ धावा उभारल्या. निपुनी हंसिकाने सर्वाधिक ४८ धावा केल्या. द. आफ्रिकेने लॉरा वोवॉल्ट नाबाद ५० आणि सून लुस नाबाद ५० यांच्या अर्धशतकी खेळीमुळे ३६.१ षटकांत १४५ धावा करीत विजय साकार केला. पाकने आयर्लंडचा ८६ धावांनी पराभव केला. पाकने ५ बाद २७१ धावा उभारल्यानंतर आयर्लंडला ४८.५ षटकांत १८५ धावांत बाद केले.