शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

द्युतीने जिंकले विश्व विद्यापीठ स्पर्धेचे सुवर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 05:26 IST

ऐतिहासिक यश : ट्रॅक अ‍ॅन्ड फिल्ड स्पर्धेत अव्वल स्थान पटकविणारी पहिली भारतीय

नेपोली : राष्टÑीय विक्रमाची मानकरी असलेली धावपटू द्युतीचंद हिने इटलीमध्ये सुवर्णपदक पटकवून ऐतिहासिक कामगिरी केली. नेपोली शहरात सुरू असलेल्या विश्व विद्यापीठ स्पर्धेच्या शंभर मीटर शर्यतीत २३ वर्षांच्या दुतीने ११.३२ सेकंद वेळेची नोंद करीत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले. चौथ्या लेनमध्ये धावत दुतीने आठ खेळाडूंमध्ये अव्वल स्थान गाठले. स्वित्झर्लंडची डेल पोंडे दुसऱ्या आणि जर्मनीची सिझा वायी तिसºया स्थानी आली.

ओडिशाची खेळाडू असलेली द्युती विश्व स्पर्धेत सुवर्ण जिंकणारी हिमा दासपाठोपाठ दुसरी भारतीय धावपटू बनली. हिमाने मागच्यावर्षी विश्व ज्युनियर अ‍ॅथलेटिक्सच्या ४०० मीटर शर्यतीच सुवर्ण जिंकले होते. द्युतीने २०१८ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत १०० आणि २०० मीटरचे रौप्य जिंकले होते. विद्यापीठ स्पर्धेत सुवर्ण जिंकणारी ती दुसरी भारतीय खेळाडू असून महिलांमध्ये ही कामगिरी तिने प्रथमच केली, हे विशेष. २०१५ साली पुरुष गटात इंदरजित सिंग याने गोळाफेकीचे सुवर्णपदक जिंकले होते. दुतीने पात्रता फेरीत ११.४१ सेकंद वेळ नोंदविली होती. द्युतीला आता दोहा येथे सप्टेंबर- आॅक्टोबरमध्ये होणाºया विश्व स्पर्धेसाठी पात्रता गाठायची आहे. विशेष म्हणजे, याआधी एकाही भारतीय स्पर्धकाला विद्यापीठ स्पर्धेमध्ये १०० मीटर शर्यतीत पात्रता फेरीपर्यंतही मजल मारता आली नव्हती. (वृत्तसंस्था)मी झेप घेतच राहणार...समलैंगिक संबंधांची कबुली देणाºया दुतीने विजयानंतर सांगितले की, ‘मला कितीही मागे ओढण्याचा प्रयत्न केला तरीही प्रयत्नपूर्वक उंच झेप घेण्याचा माझा प्रयत्न असेल. इतक्या वर्षांची मेहनत आणि सर्वांच्या आशीर्वादाच्या बळावर मी हे सुवर्णपदक जिंकू शकले.’- द्युतीचंदमान्यवरांकडून अभिनंदनविद्यापीठ स्पर्धेत शंभर मीटर शर्यत जिंकल्याबद्दल अभिनंदन. भारतीय खेळाडूचे या खेळातील हे पहिले सुवर्ण असल्याने आमचा गौरव वाढला आहे, ही कामगिरी आॅलिम्पिकमध्ये कायम राहावी.- रामनाथ कोविंद, राष्टÑपती.एका साधारण खेळाडूची असाधारण उपलब्धी. कठोर मेहनतीच्या बळावर सुवर्णझेप घेतल्याबद्दल अभिनंदन द्युतीचंद... तू या यशाची हकदार असून भारताचा गौरव वाढविला आहे.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान.