शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

विश्वचषक नेमबाजी : मनू भाकरचा डबल धमाका, ओम प्रकाशसह जिंकले दुसरे सुवर्णपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 02:26 IST

झज्जरच्या (हरियाणा) १६ वर्षीय मनू भाकरने १० मीटर एअर पिस्टल मिश्र सांघिक प्रकारात ओम प्रकाश मिथरवासह दुसरे सुवर्णपदक आपल्या नावावर करून आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत खळबळ उडवून दिली. सोमवारी मनूने महिलांच्या १० मीटर एअर पिस्टल प्रकारात सुवर्णवेध साधला होता.

नवी दिल्ली - झज्जरच्या (हरियाणा) १६ वर्षीय मनू भाकरने १० मीटर एअर पिस्टल मिश्र सांघिक प्रकारात ओम प्रकाश मिथरवासह दुसरे सुवर्णपदक आपल्या नावावर करून आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत खळबळ उडवून दिली. सोमवारी मनूने महिलांच्या १० मीटर एअर पिस्टल प्रकारात सुवर्णवेध साधला होता.मेक्सिको येथिल गुआदालाजारा येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत अकरावीत शिक्षण घेत असलेल्या मनूने आपल्या पदार्पणातच वरिष्ठ गटात सुवर्ण पदकांचा डबल धमाका केला. भारतासाठी नंबर वन झालेल्या मनू आणि ओम प्रकाश जोडीने पात्रता फेरीमध्ये ७७० गुण संपादन केले. यासह ते जर्मनीच्या ख्रिस्टियन आणि सांड्रा रेट्ज या पती-पत्नी जोडीच्या मागेच राहिले ज्यांनी विश्वविक्रमी ७७७ गुणांसह अंतिम फेरीतील आपली जागा निश्चित केली होती. अंतिम फेरीत मनू आणि ओम प्रकाशने ४७६.२१ गुणांचे सर्वाधिक लक्ष्य साधून सुवर्णपदकावर आपला हक्क प्रस्थापित केला. यामध्ये भारताच्या महिमा आगरवाल व शहजर रिजवीला ७६३ गुणांसह चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.दुसरीकडे दीपक कुमार आणि मेहूल घोष या भारतीय जोडीने चमकदार कामगिरी करताना १० मीटर रायफल मिश्र प्रकारात कांस्यपदक जिंकले. यासह भारताच्या पदकाची संख्या सहा झाली आहे. दीपक व मेहूल जोडीने पाच संघांच्या अंतिम फेरीत ४३५.१ गुण संपादन केले. भारतीय जोडीला रोमानियाच्या वे एलिन मोलदोवेयानू व लौरा जार्जेंटा कोमान जोडीकडून पराभूत व्हावे लागले. ज्यांनी ४९८.४ गुणांची कमाई करत बाजी मारली. (वृत्तसंस्था)‘सुवर्णकन्या’ मनूचा पराक्रम...भारतीय नेमबाजीच्या इतिहासात सर्वांत कमी वयात (१६ वर्षे) सुवर्णपदकाचा दुहेरी धमाका करणारी मनू पहिली नेमबाज ठरली आहे. या कामगिरीमुळे मनू आॅक्टोबरमध्ये ब्युनस येथे होणाºया युथ आॅलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरलेली पहिली युवा नेमबाज आहे.‘मला काहीच कळत नाही हे कसे साध्य झाले. माझ्यासाठी ही अविश्वसनीय कामगिरी आहे. वरिष्ठ गटात खेळण्याचे माझ्या मनावर थोडे दडपण होते. पण मी निश्चय केला होता की आपल्याला सर्वश्रेष्ठ कामगिरी करायची आहे. या यशामुळे माझा आत्मविश्वास नक्की वाढला आहे. आता माझे लक्ष आगामी स्पर्धांवर राहील. त्यामध्ये मी चांगली कामगिरी करून आपल्या देशासाठी पदक जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे,’ अशी प्रतिक्रीया मनूने यावेळी दिली.

टॅग्स :Sportsक्रीडा