मेलबोर्न : आगामी वन-डे वर्ल्डकपपूर्वी आपण दबावात असल्याची कबुली आॅस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज झेविअर डोहर्टी याने दिली आहे़ विशेष म्हणजे, वर्ल्डकपसाठी नॅथन लियॉनची निवड न करता संधी दिल्याबद्दल डोहर्टी याने निवड समितीचे आभार मानले़ नॅथन लियॉन याने भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत उत्कृष्ट कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधले होते; मात्र वर्ल्डकपसाठी संघ निवडताना आॅस्ट्रेलियन निवड समितीने लियॉनऐवजी डोहर्टीला संघात स्थान दिले आहे़ तो पुढे म्हणाला, ‘‘वर्ल्डकप संघात संधी मिळाली, याचा आनंद आहे़ आता या स्पर्धेत स्वत:ला सिद्ध करायचे आहे़ ही सुवर्ण संधी गमवायची नाही, असे ठरविले आहे.’’ मात्र, सध्या माझ्यावर दबाव आहे़ यातून लवकर बाहेर पडण्याचा माझा प्रयत्न आहे, असेही त्याने सांगितले़ आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील खेळपट्ट्यांवर वेगवान गोलंदाजांना मदत मिळते; त्यामुळे माझी संघात निवड होईल, असे वाटले नव्हते़ मात्र तरीही मला संधी मिळाली याचे समाधान आहे, असेही डोहर्टी त्याने सांगितले़
वर्ल्डकपपूर्वी दबावात : झेविअर डोहर्टी
By admin | Updated: January 15, 2015 04:28 IST