शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

विश्व बुद्धिबळ :सेतुरमणची आगेकूच, पोनोमारियोव्हला नमवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 00:29 IST

ग्रॅण्डमास्टर व माजी आशियाई चॅम्पियन एस.पी. सेतुरमणने माजी फिडे चॅम्पियन युक्रेनच्या रुस्लान पोनोमारियोव्हचा पराभव करीत विश्वकप बुद्धिबळ स्पर्धेच्या पहिल्या फेरीत धक्कादायक विजय नोंदवला.

टिबिलिसी (जॉर्जिया) : ग्रॅण्डमास्टर व माजी आशियाई चॅम्पियन एस.पी. सेतुरमणने माजी फिडे चॅम्पियन युक्रेनच्या रुस्लान पोनोमारियोव्हचा पराभव करीत विश्वकप बुद्धिबळ स्पर्धेच्या पहिल्या फेरीत धक्कादायक विजय नोंदवला.पहिला गेम बरोबरीत सोडविल्यानंतर सेतुरमणने आक्रमक खेळ करताना त्याच्यापेक्षा वरचे मानांकन असलेल्या खेळाडूचा पराभव केला. या विजयासह सेतुरमण नॉकआऊट स्पर्धेच्या दुसºया फेरीत दाखल झाला.पाचवेळा विश्व चॅम्पियन ठरलेल्या विश्वनाथन आनंदनेही दुसºया फेरीत स्थान मिळवले. त्याने मलेशियाचा आंतरराष्ट्रीय मास्टर ली तियान यिओचा पराभव केला. दुसºया गेममध्ये त्याच्याकडे एका गुणाची आघाडी होती, पण त्याने साधारण खेळ केल्यामुळे दडपण आले. यिओला संधीचा लाभ घेता आला नाही आणि आनंदने १.५-०.५ ने विजय मिळवला.हरिकृष्णाने फिडे विश्वकपच्या पहिल्या फेरीत पत्कराव्या लागलेल्या पराभवातून सावरताना दुसºया गेममध्ये ग्रॅण्डमास्टर युरी गोंजालेस विडालचा पराभव केला. जागतिक क्रमवारीत २० व्या क्रमांकावर असलेला हरिकृष्णा पांढºया सोंगट्यांसह खेळत होता. त्याने क्युबाच्या प्रतिस्पर्ध्याला चोख प्रत्युत्तर दिले. उभय खेळाडूंदरम्यान पहिल्या २० चालीपर्यंत लढतीत बरोबरी होती, पण त्यानंतर विडालने चूक केली आणि त्याच्यावर दडपण आले. हरिकृष्णाने ४१ चालींनंतर विजय मिळवला. आता टायब्रेकमध्ये खेळणार आहे. विदिती गुजरातीने पराग्वेचा एन. डेलगाडो रामिरेजचा १.५-०५ ने पराभव केला. युवा ग्रॅण्डमास्टर मुरली कार्तिकेयनने स्पेनच्या फ्रान्सिस्को वालेजो पोंसचा पराभव करीत टायब्रेकमध्ये स्थान मिळवले. तो आता बी. अधिबानसोबत टायब्रेक खेळेल. अधिबानने व्हिएतनामच्या एंगुयेन एंगोकविरुद्ध लढत बरोबरीत सोडवली. ग्रॅण्डमास्टर दीप सेनगुप्ता पहिल्या फेरीत गारद झालेला एकमेव भारतीय बुद्धिबळपटू आहे. त्याला चीनच्या वांगा हाओविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. (वृत्तसंस्था)