शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

महिला संघानेही केली कमाल

By admin | Updated: January 30, 2016 02:14 IST

भारतीय महिला क्रिकेट संघाने शुक्रवारी आॅस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा टी-२० सामना १० गडी राखून जिंकला. पावसामुळे व्यत्यय आलेल्या सामन्यात डकवर्थ लुईस नियमाचा आधार घेण्यात आला.

मेलबोर्न : भारतीय महिला क्रिकेट संघाने शुक्रवारी आॅस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा टी-२० सामना १० गडी राखून जिंकला. पावसामुळे व्यत्यय आलेल्या सामन्यात डकवर्थ लुईस नियमाचा आधार घेण्यात आला. या विजयामुळे भारताने तीन सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली आहे. भारतीय संघाचा हा आॅस्ट्रेलियातील पहिलाच मालिका विजय आहे.पावसामुळे हा सामना १८ षटकांचा करण्यात आला होता. भारताने नाणेफेक जिंकून आॅस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी दिली. आॅस्ट्रेलियाने निर्धारित षटकांत आठ बाद १२५ अशी समाधानकारक मजल मारली. मात्र, पावसामुळे भारताला १० षटकांत ६६ धावा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. भारताने ९.१ षटकांत बिनबाद ६९ धावा करीत सामना जिंकला.भारताकडून कर्णधार मिताली राजने ३२ चेंडूंत सहा चौकारांसह नाबाद ३७ धावा केल्या. स्मृती मानधनाने २४ चेंडूंत तीन चौकारासह नाबाद २२ धावा केल्या. तत्पूर्वी आॅस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिगने ३९ चेंडूंत तीन चौकार व दोन षट्कारांसह ४९ धावा केल्या. जॅस जोनासनने २७ व अ‍ॅलेक्स ब्लॅकवेलने नाबाद १२ धावा केल्या. झूलन गोस्वामीने १६ धावांत दोन, तर राजेश्वरी गायकवाडने २७ धावांत दोन बळी घेतले. पूनम यादव व हरमनप्रीत कौर यांनी प्रत्येकी एक बळी मिळविला.संक्षिप्त धावफलकआॅस्ट्रेलिया १८ षटकांत ८ बाद - १२५़ (लेनिंग ४९, जोनासेन २७.झूलन गोस्वामी २/१६, राजेश्वरी गायकवाड २/२७)़भारत : ९.१ षटकांत नाबाद ६९़ (मिताली राज नाबाद ३७, स्मृती मानधना नाबाद २२)़