शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

महिला खेळाडूंना अजूनही कमी लेखले जाते : कीरथ, सुनीतीचा आरोप

By admin | Updated: July 14, 2017 01:03 IST

कीरथ भंडाल आणि सुनीती दमानी ही दोन नावे बिलियर्ड्स आणि स्नूकरच्या विश्वात कमी परिचयाची आहेत

नवी दिल्ली : कीरथ भंडाल आणि सुनीती दमानी ही दोन नावे बिलियर्ड्स आणि स्नूकरच्या विश्वात कमी परिचयाची आहेत. परंतु त्यांच्या महिलांना मिळणाऱ्या कमी रकमेच्या पुरस्कारावरून केलेल्या आरोपाने अनेक वर्षांपासून सुरूअसलेल्या चर्चेला पुन्हा जन्म दिला आहे. अनेक वर्षे देशाचे प्रतिनिधित्व करून आणि राष्ट्रीय चॅम्पियनशिप मिळवूनही त्यांना पुरुषांच्या तुलनेत पाचपट कमी रक्कम मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.२00७ मध्ये वयाच्या दहाव्या वर्षी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पदार्पण करणाऱ्या कीरथ यांनी सांगितले की, देशासाठी इतकी वर्षे खेळूनही आम्हाला आपला खर्च स्वत:च करावा लागत आहे. यंदा मी राष्ट्रीय चॅम्पियनशिप जिंकली होती, आणि मला फक्त पाच हजार रुपये मिळाले होते. हे सांगतानाही मला संकोच वाटत आहे. दिल्लीची रहिवाशी असलेल्या कीरथ यांनी बिलियर्ड्स आणि स्नूकरमध्ये राष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहेत. देशातील अव्वल स्नूकर खेळाडू असलेल्या सुनीती दमानी यांनी २0१२ मध्ये राष्ट्रीय किताब जिंकला होता. याशिवाय त्यांनी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येही भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. सुनीती यांना ज्युनिअर गटातील किताब जिंकल्यानंतर अतिशय कमी रक्कम मिळाली होती. गेल्या वर्षी सिनिअर बिलियर्ड्स स्पर्धा जिंंकल्यानंतर त्यांना फक्त दहा हजार रुपये मिळाले होेते. पण याच स्पर्धेत पुरुष गटातील विजेत्याला ५0 हजार रुपये बक्षीस मिळाले होते.सुनीती म्हणाल्या की, आम्ही आतापर्यंत बक्षिसाच्या रकमेला व्यवहारापेक्षा भावनिकदृष्ट्या अधिक महत्त्व देत आलो आहोत. पण एकाच स्पर्धेत महिलांना पुरुषांपेक्षा पाचपट कमी रक्कम मिळते हे वास्तव पचवणे जड जात आहे. नोकरी असो, वा बक्षिसाची रक्कम सर्वत्र महिलांना कमी दर्जा दिला जात असल्याचेही सुनीती यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)