शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

कष्टाशिवाय पदक नाहीच - मनु भाकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 00:51 IST

अवघ्या १६ वर्षांच्या वयात देशाला राष्ट्रकुल आणि विश्व चषकात सुवर्ण मिळवून देणाऱ्या नेमबाजीत मनु भाकर हिचा यंदाचा कार्यक्रम खूप व्यस्त आहे. मात्र, यामुळे ती व्यथित मुळीच नाही. अनुभव अधिक मोठा करण्यासाठी ती ज्युनियर आणि राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेतही भाग घेत आहे.

नवी दिल्ली : अवघ्या १६ वर्षांच्या वयात देशाला राष्ट्रकुल आणि विश्व चषकात सुवर्ण मिळवून देणाऱ्या नेमबाजीत मनु भाकर हिचा यंदाचा कार्यक्रम खूप व्यस्त आहे. मात्र, यामुळे ती व्यथित मुळीच नाही. अनुभव अधिक मोठा करण्यासाठी ती ज्युनियर आणि राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेतही भाग घेत आहे. आशियाई स्पर्धेची भीती तिच्या मनात नाही. ती म्हणते, आव्हान हे पेलण्यासाठीच असते. त्या आव्हानाचा सामना करावाच लागेल. कष्टाशिवाय पदक मिळत नाही.मनु भाकर हिने नुकताच राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत नव्या विक्रमासह सुवर्णपदक मिळवले. आपल्या दोन वर्षांच्या कारकीर्दीत मनुने शानदार प्रदर्शन करीत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. आपल्या कामगिरीवर तिला पूर्ण विश्वास आहे. ती म्हणते, आशियाई क्रीडा स्पर्धेत मजबूत दावेदार असतात. मात्र, मी प्रत्येक स्पर्धा सर्वश्रेष्ठ करण्याचा प्रयत्न करते. मी माझी ट्रेनिंग सुरू केली आहे. आशा करते की देशाला गौरव मिळवून परंपरा कायम ठेवेन.मनुचे वडील रामकिशन यांना मनुवर मानसिक दबाव असतो काय, हे विचारले असता ते म्हणाले की, ‘ती कोणत्याही लक्ष्याचा विचारमनात ठेवत सहभागी होत नाही. ती केवळ आपल्या निशाण्यावर लक्ष केंद्रित करते. ज्यामुळे तिच्यावर दबाव पडत नाही. हार-जीत हा खेळाचा एक भाग आहे, हे तिला चांगले माहीत आहे.’ (वृत्तसंस्था)मनुच्या बारावीचा अभ्यास आई घेणारमनु सध्या १२ ला आहे. या वर्षी काही दिवसच ती भारतात राहणार आहे. त्यामुळे अभ्यास कशी करणार? असे विचारले असता तिची आई सुमेधा म्हणाल्या की, दहावीच्या परीक्षेवेळी जानेवारी आणि फेब्रुवारीत मी तिला शिकवले होते. ती चांगल्या मार्क्सनी पास झाली होती. १२ वीची परीक्षाही आता ती अशीच देईल.

टॅग्स :ShootingगोळीबारSportsक्रीडा