लंडन : विम्बल्डनमध्ये अमेरिकेच्या विनस विलियम्स आणि चीनच्या ली नाचे आव्हान तिस:या फेरीतच संपुष्टात आले.
विनसला झेक प्रजासत्ताकच्या पेट्रा क्वितोवाने क्-1 अशा पिछाडीवरून 5-7, 7-6 (7-2), 7-5 असे पराभूत केले. लीनाला झेक प्रजासत्ताकच्याच बाबरेरा स्ट्रीकोवाकडून 7-6 (7-5), 7-6 (7-5) असा सरळ सेटमध्ये पराभव पत्करावा लागला.
पुरुष गटात नोवाक जोकोव्हिज, जो विलफ्रेड त्सोंगा यांनीही चौथ्या फेरीत आपले स्थान पक्के केले. जोकोव्हिचने फ्रान्सच्या गाईल्स सिमॉन्सवर 6-4, 6-2, 6-4 असा सरळ सेटमध्ये विजय साजरा केला, तर त्सोंगाने ताइपैयच्या जीमी वांगचा 6-2, 6-2, 7-5 असा सहज पराभव केला.
तत्पूर्वी, स्वित्ङरलडचा रॉजर फेडरर आणि मारिया शारापोव्हा यांनी तिस:या फेरीत प्रवेश केला. फेडररने लक्जमबर्गच्या जाइल्स म्युलरचा 6-3, 7-5, 6-3ने सहज पराभव केला. शारापोव्हाने पात्रता फेरीचा अडथळा पार करीत मुख्य फेरीत स्थान मिळविणा:या स्वित्ङरलडच्या तिमिया बेसिनस्ज्कीचा 6-1, 6-1ने सहज पराभव केला. शारापोव्हाला तिस:या फेरीत अमेरिकेच्या एलिसन रिस्केच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.