विश्वकर्मा इन्स्टट्यिूट ऑफ टेक्नॉलॉजी संघाला विजेतेपद
By admin | Updated: August 3, 2015 22:26 IST
आंतरमहाविद्यालय टेबल टेनिस स्पर्धा : कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग संघ उपविजेता
विश्वकर्मा इन्स्टट्यिूट ऑफ टेक्नॉलॉजी संघाला विजेतेपद
आंतरमहाविद्यालय टेबल टेनिस स्पर्धा : कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग संघ उपविजेतापुणे : विश्वकर्मा इन्स्टट्यिूट ऑफ टेक्नॉलॉजी संघाने आंतरमहाविद्यालय महिलांच्या टेबल टेनिस स्पर्धेत कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग संघाचा ३-० गेमने पराभव करून विजेतेपद जिंकले. पुणे शहर विभागीय क्रीडा समितीअंतर्गत एआयएसएसएमएस आयओआयटी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या या स्पर्धेतील अंतिम लढतीत विश्वकर्मा इन्स्टट्यिूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या ऐश्वर्या गुप्ताने महिल्या एकेरीत कमिन्सच्या शेवी जैनचा सरळ तीन गेममध्ये ११-४, ११-३, ११-३ असा पराभव करून आपल्या संघाला १-० अशी आघाडी मिळून दिली. दुसर्या एकेरीत विश्वकर्माच्या तन्वी जोशीने कमिन्सच्या ममता शेळकेला ९-११, ११-०, ११-६, ११-९ असे पराभूत केले. तिसर्या गेममध्ये विश्वकर्माच्या जान्हवी चकोलीने अक्षिता मनवटीला ११-८, ११-४, १२-१४, ११-३ असे नमवून आपल्या संघाला विजेतेपद जिंकून दिले. उपांत्यफेरीच्या पहिल्या सामन्यात विश्वकर्मा इन्स्टट्यिूट ऑफ टेक्नॉलॉजी संघाने भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघाचा ३-२, तर दुसर्या लढतीत कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग संघाने आबासाहेब गरवारे कॉलेज संघाचा ३-२ गेममध्ये पराभव करून अंतिम फेरीतील आपली जागा निित केली होती. तत्पूर्वी, या स्पर्धेचे उद्घाटन एआयएसएसएमएस आयओआयटीचे प्राचार्य डॉ. प्रदीप माने यांच्या हस्ते झाले. या वेळी पुणे शहर क्रीडा विभागाच्या सहसचिव डॉ. आशा बेंगळे, प्रा. मधुकर पांडकर, प्रा. आंजुश्री आगस्टीन, प्रा. मनीषा कोंढरे, प्रा. दीपाली मोरे उपस्थित होत्या. (क्रीडा प्रतिनिधी)०००