शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईचा पारस कुमार नाशिक मॅरेथॉनचा विजेता

By admin | Updated: January 6, 2015 00:48 IST

आरोग्यासाठी धावले साडेपाच हजार नागरिक

आरोग्यासाठी धावले साडेपाच हजार नागरिक नाशिक : मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या वतीने आयोजित दुसर्‍या राष्ट्रीय, सातव्या राज्यस्तरीय तसेच १६व्या नाशिक मविप्र मॅरथॉनचे विजेतेपद मुंबईच्या पारस कुमार याने पटकावले़ आरोग्यासाठी या मॅरेथॉनमध्ये ५ हजार ६५१ स्पर्धक तसेच नागरिक धावले़ गंगापूर रोडवरील मॅरेथॉन चौकात आंतरराष्ट्रीय नेमबाज गगन नारंग यांच्या हस्ते हवेत फुगे सोडून तसेच हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेस प्रारंभ झाला़ प्रारंभी ४२़ १९५ राष्ट्रीय मॅरेथॉनच्या स्पर्धेस सुरुवात झाली. यानंतर टप्प्याटप्प्याने विविध १४ गटांतील स्पर्धांना सुरुवात झाली़ गगन नारंग व मविप्रच्या पदाधिकार्‍यांनी मॅरेथॉन मार्गावर खुल्या गाडीतून रपेट मारत धावणार्‍यांचा उत्साह वाढविला़ या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्‘ांसह उत्तर प्रदेश, बिहार, राज्यस्थान, मध्य प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, हरियाणा, दिल्ली आदि राज्यांतील ५ हजार ६५१ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला़ विजेत्यांना गगन नारंग व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले़ याप्रसंगी केटीएचएम महाविद्यालयातील उत्कृष्ट खेळाडंूचा सत्कार उपस्थितांच्या हस्ते करण्यात आला़ यामध्ये स्वप्नील चिकणे, श्वेता जाधव, अमोल बोराडे, वैशाली तांबे, उत्तरा खानापुरे, हर्षवर्धन गावित, शरयू पाटील यांचा समावेश होता़ याप्रसंगी ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे निरीक्षक विजय बेंगाळे, महाराष्ट्र हौशी ॲथलेटिक्सच्या निरीक्षक कल्पना तेंडुलकर, मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, सभापती ॲड़ नितीन ठाकरे, महापालिका आयुक्त डॉ़ प्रवीण गेडाम, क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ भीष्मराज बाम, उपसभापती नाना दळवी, चिटणीस सुनील ढिकले, संचालक भाऊसाहेब खातळे, रवींद्र देवरे, श्रीराम शेटे, नाना महाले, दिलीप मोरे, दिलीप पाटील, भरत कापडणीस, डॉ़ तुषार शेवाळे, कृष्णाजी भगत, डॉ़ विश्राम निकम, मुरलीधर पाटील, भाऊसाहेब पाटील, नंदू कोर, डॉ़ अशोक पिंगळे, प्राचार्य दिलीप धोंडगे आदि उपस्थित होते़केटीएचएममध्ये नेमबाजी प्रशिक्षण सुरू करण्याची घोषणानाशिक येथे नेमबाजी प्रशिक्षण सुरू करण्याची आपली खूप इच्छा आहे, असे याप्रसंगी आंतरराष्ट्रीय नेमबाज गगन नारंग यांनी इच्छा व्यक्त केल्यानंतर त्याला प्रतिसाद देत मविप्र संस्थेच्या केटीएचएम महाविद्यालयाच्या प्रांगणात नेमबाजी प्रशिक्षण सुरू करण्यार असल्याची घोषणा चिटणीस नीलिमा पवार यांनी केली़ तसेच या अकॅडमीत राज्य व राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंना मोफत प्रवेश तसेच राहण्याची व्यवस्था करून प्रशिक्षण देण्यात येईल,