शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

विंडीजला दे धक्का

By admin | Updated: July 31, 2016 05:52 IST

भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्माच्या शानदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यातही वेस्ट इंडीजला पहिल्या दिवशी दे धक्का दिला

किंग्स्टन : भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्माच्या शानदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यातही वेस्ट इंडीजला पहिल्या दिवशी दे धक्का दिला. आर. आश्विनचे ३, तर ईशांत शर्माच्या दोन बळींमुळे विंडीजचा डाव ३५ षटकांत ६ बाद १२६ अशा संकटाला सापडला. विंडीजच्या ब्लॅकवूडने ६२ चेंडूंत ७ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ६२ धावा केल्या. त्याची खेळी सर्वाेत्तम ठरली. इतर फलंदाज अपयशी ठरले.सबीना पार्कच्या हिरव्यागार पीचवर विंडीजचा कर्णधार जेसन होल्डनचा नाणेफेकीचा निर्णय भारतासाठी फायदेशीर ठरला. ईशांत तिसऱ्या षटकांतच सलग दोन बळी घेतले. अवघ्या ६ षटकांत विंडीजने ३ फलंदाज गमावले. दोन धक्क्यांमुळे विंडीजची अवस्था ६ षटकांत ११ धावांत ३ बळी, अशी झाली होती. त्यांचे मार्लाेन सॅम्युअल्स शून्य तर ब्लॅकवूड ४ धावांवर खेळत होते. सलामीवर ब्रेथवेट १, तर ब्राव्होला एकही धाव काढता आली नाही. दोघेही ईशांतचे बळी ठरले. तिसरा धक्का मोहंमद शमीने दिला. त्याने चंद्रिकाला ५ धावांवर बाद केले. त्यानंतर मार्लाेन सॅम्युअल्स (१४) आणि जर्मेइन ब्लॅकवूड (६२) यांनी चौथ्या गड्यासाठी ८१ धावांची भागीदारी केली. यामध्ये ब्लॅकवूडने महत्त्वपूर्ण ६२ धावांचे योगदान दिले. उपाहारापूर्वी त्याला आश्विनने पायचीत केले.दरम्यान, भारताने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना एक डाव आणि ९२ धावांनी जिंकला होता. या सामन्यात कर्णधार विराट कोहलीने दुखापतग्रस्त मुरली विजयच्या जागी लोकेश राहुल याला संधी दिली. तर, होल्डरने कार्लाेस ब्रेथवेटच्या जागी मिगेल कमन्सिला संधी दिली. >शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा वेस्टइंडीजच्या ३७ षटकांत ७ बाद १३२ धावा झाला होत्या. कर्णधार होल्डर व बिशू प्रत्येकी १ धाव काढून खेळत होते.>धावफलक: वेस्ट इंडीज (पहिला डाव) ६ बाद १२७, ब्रेथवेट झे पुजारा गो. शर्मा १, चंद्रिका झे राहुल गो. शमी ५, ब्राव्हो झे कोहली गो. शर्मा ०, सॅम्युएल झे. राहुल गो. आश्विन ३७, ब्लॅकवूड पायचीत आश्विन ६२, चेस ७, डोवरिच यष्टीचीत साहा गो. आश्विन ५. गोलंदाजी : ईशांत शर्मा १०-१-५३-२, मोहंमद शमी ७-१-१३-१, आश्विन ८-१-२३-३, उमेश यादव ५-१-२०-०, अमित मिश्रा ५-२-१८-०.