शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी पदक जिंकायचेय... - जिम्नॅस्ट राकेश पात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 23:57 IST

स्वत:चे कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी आणि आर्थिक सुबत्तेसाठी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या जिम्नॅस्टिक प्रकारात पदक जिंकण्याची इच्छा राकेश पात्रा याने व्यक्त केली.

कोलकाता : स्वत:चे कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी आणि आर्थिक सुबत्तेसाठी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या जिम्नॅस्टिक प्रकारात पदक जिंकण्याची इच्छा राकेश पात्रा याने व्यक्त केली.भारतीय आॅलिम्पिक संघटना (आयओए) तसेच भारतीय जिम्नॅस्टिक महासंघादरम्यान सुरू असलेल्या तणावपूर्ण संबंधांमुळे गोल्ड कोस्ट राष्टÑकुलसाठी २६ वर्षांचा कलात्मक जिम्नॅस्ट राकेशला आधी भारतीय संघातून वगळण्यात आले होते. त्याने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेताच न्यायालयाच्या आदेशामुळे राकेशला संघात स्थान मिळाले.ओडिशाचा रहिवासी असलेला विश्वचषकाचा फायनलिस्ट पात्रा याचा आतापर्यंतचा खेळातील प्रवास फारच अडथळ्याचा राहिला. तो पाच वर्षांचा असताना घर आगीत खाक झाले. प्राथमिक शाळेचे शिक्षक असलेल्या त्याच्या वडिलांनी मुलाच्या सरावात मात्र कुठलाही खंड पडू दिला नाही.भारतीय नौदलाचा कर्मचारी असलेला पात्रा म्हणाला, ‘वडिलांना ४०० रुपये वेतन मिळायचे. त्यातील अर्धा खर्च माझ्यावर व्हायचा. मी वडिलांना उपाशीपोटी झोपताना पाहिले आहे. ते दु:ख आठवले की मन भरून येते. माझे काका आणि कोच यांनी वडिलांना जिम्नॅस्टिकमध्ये माझे भविष्य असल्याची जाणीव करून दिली होती. त्यांनी माझी प्रत्येक गरज पूर्ण केली.’पात्रा २०१० च्या राष्टÑकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघात होता. तो पाचवेळा विश्व स्पर्धेत सहभागी झाला, पण पदकाची झोळी अद्यापही रिकामीच आहे. यावर तो म्हणतो, ‘पदकापासून वंचित राहिल्याचा खेद आहे; पण पुढील दोन वर्षांत नवी उभारी घेईन, याबद्दल आशावादी आहे. विश्वचषकात पात्रा हा चीन आणि जपानच्या खेळाडूंपाठोपाठ चौथ्या स्थानावर राहिला होता. गोल्ड कोस्टमध्ये हेदोन्ही देश सहभागी होत नसल्याने पात्राच्या पदकाची आशा वाढली आहे.‘स्पर्धेच्या दिवशी चांगली कामगिरी झाली तरच पदक मिळेल, याची मला जाणीव आहे. पुढील २० दिवस आणखी कठोर सराव करीत सर्वोत्कृष्ट कामगिरी करेन. इंग्लंड आणि कॅनडाच्या खेळाडूंंकडून मिळणारे आव्हान मोडून काढावे लागेल,’ असे गेल्या वर्षभरापासून घरापासून दूर असलेल्या पात्राने सांगितले. (वृत्तसंस्था)‘सराव आणि तयारीत व्यत्यय येऊ नये यासाठी वर्षभरापासून घरी गेलो नाही. आई-वडिलांनादेखील भेटलो नाही. माझ्या वडिलांकडे सायकल आहे. त्याऐवजी मी त्यांना स्कूटर देऊ इच्छित होतो. पण वडिलांनी ती नाकारली. पदक जिंकूनच घरी ये, असा त्यांचा आग्रह आहे. त्यांच्या कठोर तपस्येला फळ यावे,असे मनोमन वाटते.’- राकेश पात्रा, जिम्नॅस्ट

टॅग्स :Sportsक्रीडा