शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

विजयाची लय गुजरात लायन्स कायम राखणार?

By admin | Updated: April 29, 2017 12:41 IST

रॉयल चॅलेंजर्सला पराभूत केल्यामुळे आत्मविश्वास वाढलेल्या गुजरात लायन्सचा सामना शनिवारी बलाढ्य मुंबई इंडियन्सविरुद्ध होणार आहे.

राजकोट : रॉयल चॅलेंजर्सला पराभूत केल्यामुळे आत्मविश्वास वाढलेल्या गुजरात लायन्सचा सामना शनिवारी बलाढ्य मुंबई इंडियन्सविरुद्ध होणार आहे. या सामन्यातही गुजरात आपली विजयाची लय कायम राखणार का, याची उत्सुकता आहे.गुजरातचा कर्णधार सुरेश रैनाने आरसीबी विरुद्ध ३० चेंडूत नाबाद ३४ धावा केल्या होत्या. मात्र क्षेत्ररक्षण करताना त्याच्या खांद्याला दुखापत झाल्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले होते. त्यामुळे या सामन्यासाठी सुरेश रैना पूर्णपणे तंदुरुस्त असेल का, याकडेही सर्वांचे लक्ष आहे. रैनाने आतापर्यंत ३०९ धावा केलेल्या आहेत.मुंबई इंडियन्सने आठपैकी सहा सामने जिंकले आहेत, तर गुजरातने फक्त तीनच सामने जिंकले आहेत. मुंबईला दोन्ही सामन्यात पुणे सुपरजायंट्सकडून पराभूत व्हावे लागले आहे. पुढील दोन सामने जिंकून प्ले आॅफ मधील आपले स्थान नक्की करण्यासाठी मुंबई आपले कौशल्य पणाला लावेल. दुसरीकडे गुजरातला पुढील सहापैकी पाच सामन्यांत विजय संपादन करावा लागणार आहे. ड्वेन ब्राव्होच्या दुखापतीचा गुजरातला फटका बसला आहे. मात्र जेम्स फॉकनर व अ‍ॅँड्र्यू टाये याने गोलंदाजीत विविधता दाखवली आहे. फलंदाजीत मॅकूलम व अ‍ॅरॉन फिंचने प्रभावी कामगिरी केली आहे. यॉर्करचा प्रभावी मारा करणारा बासिल थम्पीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. मधल्या फळीत दिनेश कार्तिकनेही चमकदार कामगिरी केली आहे.गुणवत्तेचा विचार केल्यास मुंबई इंडियन्स खूपच पुढे आहे. जोस बटलर, कर्णधार रोहित शर्मा व किरॉन पोलार्ड हे कोणत्याही क्षणी सामना फिरवू शकतात. हार्दिक पंड्यानेही चांगली कामगिरी केलेली आहे. गोलंदाजीत मिशेल जॉन्सन व मिशेल मॅक्लेनघन यांनी प्रभावी मारा केलेला आहे. हरभजन सिंगला आतापर्यंत चारच बळी मिळवता आले आहेत, पण प्रतिस्पर्ध्यांच्या धावांवर अंकुश ठेवण्यात मात्र तो यशस्वी ठरला आहे. (क्रीडा प्रतिनिधी)