शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

‘बीसीसीआय’कडून ब्रिटिशकालीन बोधचिन्हांचा अजूनही वापर का?

By admin | Updated: June 19, 2017 01:03 IST

वसाहतीच्या राजवटीत ब्रिटिश त्यांच्याशी एकनिष्ठ राहणाऱ्या व आवडीच्या राजाला सन्मान म्हणून ‘स्टार आॅफ इंडिया’ पदक द्यायचे.

नवी दिल्ली : वसाहतीच्या राजवटीत ब्रिटिश त्यांच्याशी एकनिष्ठ राहणाऱ्या व आवडीच्या राजाला सन्मान म्हणून ‘स्टार आॅफ इंडिया’ पदक द्यायचे. या पदकासारखे दिसणारे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) बोधचिन्ह (लोगो) भारतीय क्रिकेट संघ आजही वापर का करीत आहे, अशी विचारणा केंद्रीय माहिती आयोगाने (सीआयसी) पंतप्रधान कार्यालय, खेळ व कायदा मंत्रालयाला केली आहे. ब्रिटिश राजवटीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स्टार आॅफ आॅर्डरप्रमाणे बीसीसीआयचे हे बोधचिन्ह आहे, असे आयोगाने म्हटले. भारतात स्वातंत्र्यासाठी १८५७ मध्ये पहिले युद्ध (बंड) झाल्यानंतर ब्रिटिश राजघराण्याने भारतावरील आपले सार्वभौमत्व घट्ट करण्यासाठी आपल्याशी एकनिष्ठ राहणाऱ्या भारतीय राजांचा सन्मान करण्यासाठी स्टार आॅफ इंडिया हा नवा सन्मान बहाल करायला प्रारंभ केला. वसाहतीच्या काळातील हा वारसा बीसीसीआय आजही मिरवत आहे ही बाब कोणाच्याही लक्षात आली नाही का, आजही क्रिकेट संघ हे बोधचिन्ह मिरवत आहे, असे आयोगाने म्हटले. बीसीसीआयने हे बोधचिन्ह बदलून त्याऐवजी देशाचा तिरंगा ध्वज किंवा चार सिंह किंवा अशोक धर्म चक्र किंवा सरकारने निवडलेले इतर कुठलेही चिन्ह का घेतले नाही, अशी विचारणाही आयोगाने केली आहे. बीसीसीआयला माहितीच्या अधिकार कायद्याखाली आणण्याबद्दल लोकसभेत सांगण्यात आल्यानंतरही सरकार का आणत नाही याचा खुलासा आयोगाने या अधिकाऱ्यांकडून मागितला आहे. (वृत्तसंस्था)