विशाखापट्टणम : प्ले आॅफ दौडीबाहेर झालेले दोन संघ किंग्स इलेव्हन पंजाब आणि रायसिंग पुणे सुपरजायन्टस् आयपीएलच्या नवव्या पर्वाचा आज शनिवारी अखेरचा सामना खेळणार असल्याने विजयी निरोप घेण्याची उभय संघांची इच्छा आहे.पुणे संघाने होम ग्राऊंड असलेल्या याच मैदानावर दिल्ली डेअरडेव्हिल्सचा पराभव केला होता. पंजाबने मागचे दोन्ही सामने गमविले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबादने त्यांना नमविले होते. या सत्रातील चौथा आणि अखेरचा विजयदेखील पंजाबला याच मैदानावर मिळाला. त्यावेळी पंजाबने मुंबई इंडियन्सचा पराभव केला होता. धोनीसाठी हा वेगळाच अनुभव आहे. याआधी सर्वच आयपीएलमध्ये त्याने चांगली कामगिरी केली होती. यंदा प्रथमच पुण्याकडून खेळला आणि अपयशी ठरला. पुण्याला सर्वाधिक फटका जखमी खेळाडूंचा बसला. केविन पीटरसन, स्टीव्हन स्मिथ, फाफ डु प्लेसिस व मिशेल मार्श हे सर्वजण संघातून अखेरपर्यंत खेळू शकले नाहीत. जखमी होऊन बाहेर पडलेल्या या खेळाडूंमुळे धोनीला अंतिम ११ जणांची निवड करणे कठीण गेले.>उभय संघ यातून निवडणाररायझिंग पुणे सुपरजायंट्स : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रविचंद्रन आश्विन, मिशेल मार्श, सौरभ तिवारी, ईशांत शर्मा, इरफान पठाण, रुद्रप्रतापसिंह, रजत भाटिया, अंकित शर्मा, बाबा अपराजित, मुरुगन आश्विन, स्कॉट बोलँड, अंकुश ब्यांस, उस्मान ख्वाजा, अशोक डिंडा, जसकरम सिंग, ईश्वर पांडे, थिसारा परेरा, जॉर्ज बेली व अॅडम झम्पा.किंग्ज इलेव्हन पंजाब : डेव्हिड मिलर (कर्णधार), काईल अॅबोट, मोहित शर्मा, मिचेल जॉन्सन, ग्लेन मॅक्सवेल, हाशिम आमला, मनन व्होरा, मुरली विजय, ऋषी धवन, शॉन मार्श, वृद्धिमान साहा, गुरकीरतसिंग मान, संदीप शर्मा, अक्षर पटेल, मार्क्स स्टोइनिस, निखिल नाईक, अनुरितसिंग, शार्दूल ठाकूर, फरहान बेहरदिन, के. सी. करीअप्पा, अरमान जफर, प्रदीप साहू, निखिल नाईक, मनन वोरा व स्वप्निल सिंग.
विजयी निरोप कोणाला?
By admin | Updated: May 21, 2016 04:55 IST