शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
6
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
7
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
8
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
9
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
10
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
11
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
12
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
13
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
14
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
15
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
16
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
17
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
18
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
19
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
20
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान

चषक कोणाकडे?

By admin | Updated: June 7, 2015 00:52 IST

रोमहर्षक सामन्यात सर्बियाच्या नोवाक जोकोवीचने ब्रिटनच्या अ‍ॅँडी मरेचा पराभव केला. याबरोबरच त्याने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक दिली.

पॅरिस : रोमहर्षक सामन्यात सर्बियाच्या नोवाक जोकोवीचने ब्रिटनच्या अ‍ॅँडी मरेचा पराभव केला. याबरोबरच त्याने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक दिली. आता त्याची लढत स्टॅनिसलास वॉवरिन्काविरुद्ध होईल. त्यामुळे यंदाचा चषक कुणाकडे याची उत्सुकता वाढली आहे. जोकोवीचकडे करिअरमधील तिसरा ग्रॅण्डस्लॅम पूर्ण करण्याची संधी आहे. नऊ वेळा चॅम्पियन ठरलेल्या स्पेनच्या राफेल नदालचा जोकोविचने उपांत्यपूर्व फेरीत पराभव केला होता. त्यानंतर अ‍ॅँडी मरे याच्यावर त्याने पाच सेटपर्यंत चाललेल्या सामन्यात बाजी मारली. हा सामना त्याने ६-३, ६-३,५-७, ५-७ आणि ६-१ ने जिंकला. शुक्रवारी झालेल्या या सामन्यात वादळामुळे ‘ब्रेक’ देण्यात आला होता. त्या वेळी चौथ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडू ३-३ अशा बरोबरीवर होते. मरे याने पहिले दोन सेट गमावल्यानंतर पुढील दोन सेट जिंकत सामना २-२ अशा बरोबरीवर आणला. मात्र, निर्णायक सेटमधे सर्बियाच्या जोकोविचने सहज मात करीत आठवा विजय नोंदवला. विशेष म्हणजे, जानेवारीमध्ये झालेल्या आॅस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्येही जोकोविचने अ‍ॅँडी मरेचा पराभव केला होता.