केदार लेले, लंडनसॉची (रशिया) येथे भारताचा विश्वनाथन आनंद आणि नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन यांच्यात जगज्जेतेपदासाठी लढत होणार आहे. ७ नोव्हेंबरला या स्पर्धेचे उद्घाटन होणार असून ८ नोव्हेंबरपासून लढतीला प्रारंभ होईल. विश्वनाथन आनंद, मॅग्नस कार्लसनला जगज्जेतेपदासाठी आव्हान देणार आहे. फिडे जगज्जेतेपद बुद्धिबळ स्पर्धेत आनंद आणि कार्लसन दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत.या लढतीत मॅग्नस कार्लसन विजयी होईल, असे भाकीत अनेक बुद्धिबळतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. पण, जर विश्वनाथन आनंद याने पुन्हा एकदा फिडे बुद्धिबळ विश्वविजेतेपद जिंकले, तर तो एक ऐतिहासिक क्षण असेल आणि एक विक्रमसुद्धा ठरेल.मॅग्नस कार्लसन (विश्व नं. १) जवळपास तीन वर्षे (म्हणजेच सलग ३३ रेटिंग लिस्ट आणि नोव्हेंबर २०१४ पर्यंत) विश्वनाथन आनंदपेक्षा ७१ एलो गुणांनी पुढे आहे. परतीच्या होणाऱ्या या लढतीकडे संपूर्ण बुद्धिबळ विश्वाचे लक्ष लागलेले आहे. चला तर थोडासा आढावा घेऊ यात विश्वनाथन आनंद आणि मॅग्नस कार्लसन यांच्यात दुसऱ्यांदा होणाऱ्या फिडे जगज्जेतेपद बुद्धिबळ स्पर्धेचा...
काळ्या-पांढ-या घरांचा राजा कोण?
By admin | Updated: November 7, 2014 01:49 IST