भारता सोबतची एक दिवसीय मालिका सोडत वेस्ट इंडीजची टिम मायदेशी जाणारऑनलाइन लोकमतधरमशाला, दि. १७ - मानधनावरून वेस्ट इंडीजचे खेळाडू आणि क्रिकेट बोर्ड यांच्यातील वाद विकोपाला गेला असून वेस्ट इंडीजचा संघ पाचवा एक दिवसीय सामना खेळणार नसल्याचे खेळाडूंनी जाहीर केले आहे. विंडीज क्रिकेटबोर्ड खेळाडूंना योग्य मानधन देत नाही,तसेच खेळाडूंच्या तक्रारी ऐकून घेत नसल्याने खेळाडूंनी हा निर्णय घेतला आहे. या बाबत बीसीसीआयने ट्विटरवरून वेस्ट इंडीज संघाचा हा निर्णय धक्कादायक आणि निराशाजनक असल्याचे म्हटले आहे. वेस्ट इंडीजचा संघ भारताविरुद्ध खेळत असलेला चौथा सामना आज अर्धवट सोडून जाण्याच्या तयारीत होता. परंतू भारतातील क्रिकेटच्या अधिका-यांनी यामुळे सामना बघण्यास आलेले प्रेक्षक नाराज होतील असे सांगत संघाची समजूत घातली व त्यांना सामना खेळण्याची विनंती केली. विंडीज विरुद्ध भारतीय संघात होणारे सामने रद्द करण्यात आल्याने येत्या नोव्हेंबर बीसीसीआयने श्रीलंकेसोबत एख दिवसीय सामन्यांचे नियोजन केले आहे. विंडीज संघाने पाच एक दिवसीय सामने, टि-२० आणि तीन कसोटी सामने खेळण्यास नकार दिला आहे. यासंदर्भात बीसीसीआयने आयसीसी सोबत बैठक घेऊन वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डावर खटला दाखल करण्याच्या विचारात आहे.
एक दिवसीय मालिका सोडून वेस्ट इंडीज संघ मायदेशी परतणार
By admin | Updated: October 17, 2014 17:34 IST