शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

शेवटच्या चेंडूवर विंडीज ‘चॅम्पियन’

By admin | Updated: August 28, 2016 05:20 IST

शेवटच्या चेंडूवर दोन धावा... अशी उत्कंठावर्धक स्थिती असताना स्ट्राईकवरील महेंद्रसिंह धोनीचा फटका शॉर्ट थर्डमॅनवर उभ्या असलेल्या सॅम्युअल्सच्या हातात विसावला अन् वेस्ट

फ्लोरिडा : शेवटच्या चेंडूवर दोन धावा... अशी उत्कंठावर्धक स्थिती असताना स्ट्राईकवरील महेंद्रसिंह धोनीचा फटका शॉर्ट थर्डमॅनवर उभ्या असलेल्या सॅम्युअल्सच्या हातात विसावला अन् वेस्ट इंडिजने ‘ब्राव्हो चॅम्पियन’चा जल्लोष केला. दुसरीकडे, टी-२० क्रिकेट इतिहासातील सर्वात वेगवान दुसरे शतक ठोकणाऱ्या राहुलच्या शानदार खेळीवर पाणी फेरले. राहुलने ५१ चेंडूंत पाच षटकार आणि १२ चौकारांच्या मदतीने नाबाद ११० धावा केल्या. त्याने रोहित शर्मासोबत ८९ तर धोनीसोबत सातव्या विकेटसाठी १०७ धावांची भागीदारी केली. असे असतानाही वेस्ट इंडिजच्या २४६ धावांचा पाठलाग करताना भारताने ४ बाद २४४ धावांपर्यंत मजल मारली. राहुलने केवळ ४६ चेंडूंत शतक पूर्ण केले. शेवटच्या पाच षटकांत भारताला ६४ धावांची गरज होती. धोनीने रसेलच्या गोलंदाजीवर षटकारासह १७ व्या षटकांत भारताचे द्विशतक पूर्ण केले. त्यानंतर राहुलने रसेलच्या गोलंदाजीवर षटकार ठोकत शतक पूर्ण केले. भारताला शेवटच्या षटकात आठ धावांची आवश्यकता होती. अशा वेळी पहिल्या चार चेंडंूवर चार धावा मिळाल्या. पाचव्या चेंडूवर दोन तर शेवटच्या चेंडूवर धोनी बाद झाला. त्याआधी, सलामीवीर एव्हिन लुईसच्या (१०० धावा, ४९ चेंडू, ५ चौकार, ९ षटकार) वेगवान शतकी खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने ६ बाद २४५ धावांची विक्रमी मजल मारली होती. लुईसने कारकिर्दीत प्रथमच शतकी खेळी केली. विंडीजच्या डावात जॉन्सन चार्ल्सचे (७९ धावा, ३३ चेंडू, ६ चौकार, ७ षटकार) योगदानही उल्लेखनीय ठरले. भारतातर्फे रवींद्र जडेजा व जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. लुईसचे टी-२० क्रिकेट इतिहासातील हे पाचवे वेगवान शतक ठरले. लुईसने चार्ल्ससोबत सलामीला शतकी भागीदारी केली. लुईसने ४९ चेंडूंना सामोरे जाताना ५ चौकार व ९ षटकारांच्या मदतीने १०० धावांची खेळी केली. त्याने चार्ल्ससोबत ९.३ षटकांत सलामीला १२६ धावांची आणि आंद्रे रसेलसोबत (२२) दुसऱ्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी केली. लुईसने ४८ चेंडूंमध्ये शतक ठोकले. वेस्ट इंडिजची टी-२० क्रिकेटमध्ये ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. भारताविरुद्धही ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी विंडीजने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ६ बाद २३६ धावा फटकावल्या होत्या.(वृत्तसंस्था)विक्रमी सामना.. टी-२० क्रिकेट इतिहासातील वेस्ट इंडिजच्या आजच्या धावा सर्वाधिक ठरल्या. याआधी, त्यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जोहान्सबर्ग येथे ६ बाद २३६ धावा केल्या होत्या. त्यांचा संघ एका वेळी ११ षटकांत १ बाद १६४ धावांवर होता. मात्र, अंतिम ९ षटकांत ८१ धावाच करता आल्या. विंडीजने आपल्या डावात २१ षटकार आणि १३ चौकार ठोकले. एका डावात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रमही त्यांनी आपल्या नावे केला. याआधी, नेदरलॅँडने २०१४ मध्ये आयर्लंडविरुद्ध १९ षटकार ठोकले होते. त्या वेळी एकूण ३० षटकार ठोकले गेले. आजच्या सामन्यात एकूण ३२ षटकार ठोकले गेले. सर्वाधिक सामन्यांचे नेतृत्त्व करण्याचा धोनीच्या नावे विक्रम एकदिवसीय कर्णधार महेंद्रसिंह धोनीने वेस्टइडिजविरुद्ध शनिवारी अमेकिरन भूमीवर एक विक्रम आपल्या नावे केला. विंडिजविरुद्ध टी-२० सामन्याचा नाणेफेक उडवताच तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक सामन्यांचे नेतृत्व करणारा ‘कर्णधार’ ठरला. ७३ दिवसांनंतर मैदानात उतरणाऱ्या धोनीने आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंगचा ३२४ सामन्यांत कर्णधारपदाचा विक्रम मागे टाकला. कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या धोनीने ६० सामन्यांत नेतृत्व केले. तर १९४ एकदिवसीय सामन्यात त्याने कर्णधारपद सांभाळले आहे. ३५ वर्षीय धोनीने १९४ एकदिवसीय सामन्यात १०७ विजय मिळवून दिले आहेत.धावफलकवेस्ट इंडीज : जॉन्सन चार्ल्स त्रि. गो. शमी ७९, एव्हिन लुईस झे. अश्विन गो. जडेजा १००, आंद्रे रसेल पायचित गो. जडेजा २२, किरोन पोलार्ड त्रि. गो. बुमराह २२, कार्लोस ब्रेथवेट धावबाद १४, ड्वेन ब्राव्हो नाबाद ०१, लेंडल सिमन्स त्रि. गो. बुमराह ००, मार्लोन सॅम्युअल्स नाबाद ०१. अवांतर (६). एकूण २० षटकांत ६ बाद २४५. बाद क्रम : १-१२६, २-२०४, ३-२०५, ४-२३६, ५-२४४, ६-२४४. गोलंदाजी : शमी ४-०-४८-१, भुवनेश्वर कुमार ४-०-४३-०, बुमराह ४-०-४७-२, अश्विन ४-०-३६-०, जडेजा ३-०-३९-२, स्टुअर्ट बिन्नी १-०-३२-०.भारत : रोहित शर्मा झे. चार्ल्स गो. पोलार्ड ६२, अजिंक्य राहणे झे. ब्राव्हो गो. रसेल ७, विराट कोहली झे. फ्लेचर गो. ब्राव्हो १६, राहुल नाबाद ११०, धोनी झे. सॅम्युअल्स गो. ब्राव्हो ४३. बाद क्रम : १-३१, २-४८, ३-१३७, ४-२४४. गोलंदाजी : रसेल ४-०-५३-१, बद्री २-०-२५-०, ब्राव्हो ४-०-३७-२, नरीन ३-०-५०-०, ब्रेथवेट ४-०-४७-०, पोलार्ड ३-०-३०-१.