शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

अझारेंकाविरुद्ध वेस्निनाचा अनपेक्षित पराभव

By admin | Updated: July 6, 2017 01:44 IST

फ्रान्सचा जो - विल्फ्रेड त्सोंगा, लक्समबर्गचा जाइल्स मुल्लर आणि स्पेनचा रॉबर्टो बटिस्टा अगुट या नामांकित खेळाडूंनी आपआपल्या

लंडन : फ्रान्सचा जो - विल्फ्रेड त्सोंगा, लक्समबर्गचा जाइल्स मुल्लर आणि स्पेनचा रॉबर्टो बटिस्टा अगुट या नामांकित खेळाडूंनी आपआपल्या सामन्यात विजय मिळवताना विम्बल्डनची विजयी सुरुवात केली. त्याचवेळी महिला गटामध्ये बेलारुसच्या व्हिक्टोरिया अझारेंकाने अनपेक्षित निकाल लावताना रशियाच्या एलेना वेस्निना हिला नमवून स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. स्लोवाकियाच्या आठव्या मानांकीत डॉमनिका सिबुल्कोवा हिने अपेक्षित विजयी सलामी देताना अमेरिकेच्या जेनिफर ब्रेडीला नमवले. त्सोंगाने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करताना इटलीच्या सिमोन बोलेल्ली याला सरळ तीन सेटमध्ये ६-१, ७-५, ६-२ असे नमवले. दुसऱ्या सेटमध्ये कडवी लढत देत सिमोनने त्सोंगापुढे काहीसे आव्हान उभे केले. मात्र, अनुभवाच्या जोरावर दुसरा सेट अंतिम क्षणी जिंकल्यानंतर त्सोंगाने यानंतर पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत तिसरा सेट सहज जिंकताना पुढच्या फेरीत आगेकूच केली. त्याचवेळी, मुल्लरला विजयी कूच करण्यासाठी झेक प्रजासत्ताकच्या लुकास रोसोलविरुद्ध ५ सेटपर्यंत झुंजावे लागले. तब्बल ३ तास ३७ मिनीटांपर्यंत रंगलेल्या या रोमांचक सामन्यात मुल्लरने ७-५, ६-७(७-९), ४-६, ६-३, ९-७ अशी बाजी मारली. तसेच अगुटलाही पहिल्या फेरीत विजय मिळवण्यासाठी जर्मनीच्या पीटर गोजोवक्झीविरुध्द ६-२, ६-१, ३-६, ६-३ असे चार सेटपर्यंत झुंजावे लागले. वेस्निनाच्या अनपेक्षित पराभवामुळे महिला गटाचा तिसरा दिवस गाजला. अझारेंकाने अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करत कसलेल्या वेस्निनाचे आव्हान सरळ दोन सेटमध्ये ६-३, ६-३ असे परतावले. अझारेंकाच्या आक्रमक खेळापुढे वेस्निनाचा काहीच निभाव लागला नाही. त्याचवेळी, आठव्या मानांकीत व्हिबुलकोवाने सरळ दोन सेटमध्ये बाजी मारत सहज विजयी सलामी देताना अमेरिकेच्या ब्रेडीला ६-४, ६-४ असा स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. निशिकोरीची सलामीआशियाचा अव्वल खेळाडू जपानचा केई निशिकोरीने विजयी सलामी दिली खरी, परंतु यासाठी त्याला झुंजावे लागले. ३ तास १५ मिनीटांपर्यंत रंगलेल्या सामन्यात निशिकोरीने युक्रेनच्या सर्जी स्टाखोवस्कीचा ६-४, ६-७(७-९), ६-१, ७-६(८-६) असा पाडाव केला.