ऑनलाइन लोकमतमुंबई, दि.२ - काही दिवसांवर येवून ठेपलेल्या रिओ आॅलिम्पिकसाठी नेटिझन्स देखील सज्ज झाले आहेत. युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालयाने भारताच्या आॅलिम्पियन खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी ट्विटरवर ‘हॅश टॅग खेलो इंडिया’ या डिजीटल उपक्रमाचा शुभारंभ केला आहे. या उपक्रमांतर्गत ट्विटरवरील ‘डिपी’ मध्ये बदल दिसून येत आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री विजय गोयल यांनीही हॅशटॅग खेलो इंडियाच्या माध्यमाने भारतीय खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी आपल्या डिपीमध्ये बदल केला आहे. दरम्यान, यापूर्वीही मोदी सरकारच्या वतीने फेसबूकवर डिजिटल इंडियाच्या माध्यमाने डिपी बदलण्याचा विकल्प उपलब्ध करण्यात आला होता. त्या पार्श्वभुमीवर यंदा ट्विटरवर ‘हॅशटॅगखेलो इंडिया’ उपक्रमाला सुरुवात झाली आहे.असा बदला डिपी...हॅशटॅग खेलो इंडिया १) क्रीडा मंत्रालयाच्या ट्विटरवर अकाऊंटवर हॅशटॅग खेलो इंडिया ही लिंक दिसते.२) त्या लिंक वर क्लिक केल्यास नवीन विंडो ओपन होते. ३) ‘चेक टू मेक युवर प्रोफाईल फोटो’ यावर क्लिक केले असता, ट्विटरच्या वतीने परवानगी विचारली जाते.४) त्या ठिकाणी अथोराईज्ड अॅप वर क्लिक केले असता काही सेकंदात ट्विटरवरील डिपीमध्ये बदल होतो.