रिओ : साईकोम मीराबाई चानूचे महिला वेटलिफ्टिंगच्या ४८ किलोगटात शनिवारी पदक जिंकण्याकडे लक्ष असेल.भारताचा सतीश शिवलिंगम पुरुषांच्या ७७ किलोगटात १० आॅगस्टला खेळेल. मीराबाईने जूनमध्ये भारतीय महिलांच्या स्पर्धेत निवड चाचणीत रिओचे तिकीट पक्के केले होते. तिने १९२ किलो वजन उचलताना लंडनमध्ये महिलांच्या ४८ किलोगटातील कांस्यपदकाच्या कामगिरीशी बरोबरी केली होती. वेटलिफ्टिंगमध्ये भारताकडून आॅलिम्पिकमध्ये केवळ मल्लेश्वरीने पदक जिंकले आहे. तिने २००० सिडनी आॅलिम्पिकमध्ये कांस्य जिंकले होते.(वृत्तसंस्था)
वेटलिफ्टर मीराबाईला पदकाची आशा
By admin | Updated: August 6, 2016 03:33 IST