मुंबई : मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी आम्हाला आमच्या खेळाडूंचा अभिमान वाटायला हवा, कारण ते आमच्या राष्ट्राचा सन्मान वाढवतात, असे सांगितले.७३ वर्षीय महानायकाने सोशल मीडियावर खेळाविषयी आपले विचार मांडले आणि लोकांनी खेळाडूंवर टीका करण्याआधी त्यांना समजून घ्यायला हवे, असे सांगितले. त्यांनी टिष्ट्वटरवर लिहिले, ‘खेळ, खेळाडू राष्ट्राचा सन्मान वाढवितात... त्यांना प्रेम... काळजी आणि ओळखण्याची व सन्मानाची आवश्यकता आहे... कम आॅन इंडिया’.एका अन्य पोस्टमध्ये त्यांनी टिष्ट्वट केले, ‘मी रिओ २0१६ मध्ये सायनाला खेळताना पाहिले होते आणि तिने ज्या प्रतिस्पर्ध्याला नमविले होते, तिच्याकडून ती पराभूत होत होती. तिला गुडघेदुखीचा त्रास होत होता. ती गुडघा वाकवू शकत नव्हती, तरीही दुखापतीनंतरही ती खेळली.’’
आम्हाला खेळाडूंचा अभिमान वाटायला हवा : अमिताभ
By admin | Updated: August 29, 2016 01:44 IST