ऑनलाइन लोकमत
धरमशाला (हिमाचल प्रदेश), दि. ३ - पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा फटका आम्हाला बसला आणि आम्ही हरलो असं सांगत भारताचा कप्तान महेंद्र सिंग ढोणीने पराभवाचे खापर अंपायर्सच्या डोक्यावर फोडले आहे. तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिल्याच सामन्यात रोहीत शर्माच्या शतकी खेळीच्या जोरावर २०० धावा करणारा भारत दक्षिण अफ्रिकेसमोर साच गडींनी पराभूत झाला. जे. पी. ड्युमिनी १७व्या षटकामध्ये भुवनेश्वरकुमारच्या गोलंदाजीवर पायचीत असल्याचे उघड दिसत असताना पंचांनी त्याला नाबाद ठरवले आणि सामना हातातून गेला अशी खंत ढोणीने व्यक्त केली आहे.
अर्थात, ड्युमिनीने अत्यंत सुंदर व प्रसंगाला साजेसा खेळ केला असं कौतुकही ढोणीने केले आहे.