मुंबई : संपूर्ण स्पर्धेत फारशी चमक न दाखवलेल्या युवराज सिंगने मंगळवारी झालेल्या मुंबई इंडियन्सविरुद्ध झुंजार अर्धशतक झळकावून फॉर्ममध्ये आल्याचे संकेत दिले खरे; मात्र मुंबईचे आघाडीचे ४ फलंदाज ४० धावांवर बाद करूनदेखील दिल्लीला पराभव पत्करावा लागावा, यामुळे युवी निराश झाला आहे.या सामन्यानंतर युवीने प्रतिक्रिया दिली, की मुंबईचे ४ फलंदाज ४० धावांत बाद केल्यानंतर आम्हाला सामना जिंकायला हवा होता. मात्र यानंतर आम्ही बळी घेण्यात अपयशी ठरलो. पावसानंतर खेळपट्टी फलंदाजीला योग्य झाली. फिरकीपटूंना मदत मिळवत नव्हती आणि याचा फायदा मुंबईला झाला. तरी मुंबईने चांगला खेळ केला यात वाद नाही, असे युवी म्हणाला. युवीने या सामन्यात ४४ चेंडंूत ५७ धावा काढताना यंदाच्या आयपीएलमधील दुसरे अर्धशतक झळकावले. शिवाय मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि भरवशाचा अंबाती रायुडू यांनी निर्णायक खेळी करताना मुंबईला विजय मिळवून दिला. या दोघांच्या या खेळीचेदेखील युवीने या वेळी कौतुक केले. (वृत्तसंस्था)
आम्हाला सामना जिंकायला हवा होता : युवराज सिंग
By admin | Updated: May 7, 2015 03:42 IST