शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक स्पर्धेसाठी आम्ही सज्ज : ज्वाला

By admin | Updated: August 2, 2015 01:20 IST

आगामी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी माझी आणि अश्विनी पोनप्पाची तयारी चांगल्या पद्धतीने सुरू असून, आम्ही या स्पर्धेसाठी सज्ज आहोत. या स्पर्धेत मानांकन मिळालेली आमची पहिली जोडी

मुंबई : आगामी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी माझी आणि अश्विनी पोनप्पाची तयारी चांगल्या पद्धतीने सुरू असून, आम्ही या स्पर्धेसाठी सज्ज आहोत. या स्पर्धेत मानांकन मिळालेली आमची पहिली जोडी असल्याने ही खूप मोठी गोष्ट आहे, असे भारताची दुहेरी गटातील अव्वल महिला बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा हिने सांगितले.ठाणे येथील श्रीमती सुलोचनादेवी सिंघानीया स्कूलच्या बंदिस्त क्रीडाभवनाचे शनिवारी ज्वालाच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी ज्वालाने प्रतिक्रिया दिली. आगामी जागतिक स्पर्धेविषयी अधिक बोलताना ज्वाला म्हणाली की, ‘स्पर्धेतील पहिला सामना आमच्या साठी खूप महत्त्वाचा असेल. अश्विनी आणि माझी केमिस्ट्री चांगली असल्याने आम्ही नक्कीच या स्पर्धेत यशस्वी कामगिरी करू, असा विश्वास आहे.’याव्यतिरीक्त देशातील बॅडमिंटन प्रगतीविषयी ज्वालाने सांगितले की, ‘बॅडमिंटनच्या प्रसारासाठी जास्तीत जास्त स्पर्धांचे आयोजन होणे गरजेचे आहे. प्रत्येक नवोदित खेळाडूला दर वर्षी कमीत कमी २०-२५ स्पर्धा खेळण्याची संधी मिळायला हवी. आज युवा खेळाडूंना म्हणावी तितकी संधी मिळत नसल्याने, माझ्या व अश्विनीच्या तुलनेत सध्याच्या व भविष्यातील खेळाडूंच्या कामगिरीत खूप फरक दिसेल.’ तसेच, बॅडमिंटन मध्ये सुपरपॉवर बनायचे असल्यास यूथटॅलेंट सर्वांसमोर येणे गरजेचे असल्याचेदेखील ज्वालाने सांगितले.दरम्यान, आॅलिम्पिकनिमित्त भारत सरकारने राबविलेल्या ‘टॉप्स’ योजनेबाबत ज्वालाने अनभिज्ञ असल्याचे सांगितले. याविषयी ती म्हणाली की, ‘याबाबतीत मला मीडियामधूनच माहिती मिळत आहे. मला आणि अश्विनीला सरकारी मदतीची नितांत गरज आहे. सरकारच्या पाठिंब्यामुळे आमच्या वरील दबाव कमी होऊन आम्हाला यशस्वी कामगिरीचा विश्वास मिळेल.’ (क्रीडा प्रतिनिधी)