शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

आॅलिम्पिक खेळ लोकप्रिय न होण्यामागे आम्हीच दोषी : सलमान

By admin | Updated: April 24, 2016 03:54 IST

भारतात आॅलिम्पिक खेळ लोकप्रिय न होण्यामागे आम्ही स्वत: दोषी आहोत. भारतीय लोक क्रिकेटच्या तुलनेत अन्य खेळांना पसंत करीत नाहीत. पाठिंबा देण्यात कमी पडत असल्याने आॅलिम्पिक

नवी दिल्ली : भारतात आॅलिम्पिक खेळ लोकप्रिय न होण्यामागे आम्ही स्वत: दोषी आहोत. भारतीय लोक क्रिकेटच्या तुलनेत अन्य खेळांना पसंत करीत नाहीत. पाठिंबा देण्यात कमी पडत असल्याने आॅलिम्पिक खेळ देशात मागे राहिल्याचे रोखठोक प्रतिपादन बॉलिवूड स्टार सलमान खान याने केले आहे. सलमानला रियो आॅलिम्पिकसाठी भारतीय ब्रॅन्ड अ‍ॅम्बॅसिडर बनविण्यात आले आहे.सलमान म्हणाला,‘‘अन्य खेळ लोकप्रियतेत माघारण्यामागे क्रिकेटला दोष दिला जातो. पण, माझ्या मते लोक अन्य खेळ पाहू इच्छित नाहीत. जितके प्रेक्षक आॅलिम्पिक खेळांना मिळायला हवे तितके भारतात मिळत नाहीत. क्रिकेट पसंत करणारे लोक गल्लीबोळात आहेत. अन्य खेळांच्या तुलनेत क्रिकेटला अधिक महत्त्व दिले जात असल्याने आम्ही स्वत: दोषी आहोत.’’ जगातील लोक आॅलिम्पिकसाठी एकत्र येतात. लोकांना आपल्या हिरोंना पाहण्याची संधी मिळते. पण, यापुढे मी आॅलिम्पिक खेळांना लोकप्रिय करण्यासाठी मेहनत घेणार आहे. भारतीय खेळाडूंचा उत्साह वाढविण्यााठी रियोला जाण्याची योजना आखत असल्याचे सलमानने सांगितले.(वृत्तसंस्था)