स्वदेश घाणेकर, मुंबईनिकोलस अनेल्काच्या आगमनाने बुस्ट झालेल्या मुंबई सिटीने डी वाय पाटील स्टेडियमवर इंडियन सुपर लीगमधील (आयएसएल) सलग दुस-या विजयाची नोंद केली. बुधवारी मुंबईने अनेल्काच्या करिष्म्याच्या बळावर दिल्ली डायनामोसवर १-० असा विजय मिळवला. सामन्याचया ५९व्या मिनिटाला अनेल्काने अप्रतिम गोल केला, तर ९३व्या मिनिटाला सुब्रतो पॉल याने गोलपोस्ट रेषेनजीक चेंडू अडवून मुंबईच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. या विजयाबरोबर मुंबईने गुणतालिकेत तिस-या स्थानावर झेप घेतली. मुंबईिवरु द्धच्या लढतीत दिल्लीने आक्र मणऐवजी स्पेनची ’टिकी टाका’ स्टाईल वापरली. लहान लहान पास देउन त्यांनी अनेकदा चेंडू गोलपोस्टच्या जवळ नेला, परंतु त्यांना गोलमध्ये रु पांतर करण्यात अपयश आले. 11व्या मिनिटाला चक्र वर्ती याने मिडफिल्डवरून डायसला पास दिला. डायसचा क्र ॉस अडविण्यात मुंबईच्या खेळाडूंना यश आले. १८व्या मिनिटाला मुंबईचा मिडफिल्डर जॅन त्सोहांजल हा दिल्लीच्या खेळाडूंना चकवत १८ यार्डापर्यंत घेउन गेला आण ितेथून त्याने केलेला अटॅक दिल्लीचा गोली क्रि स्तोफ वॅन हाउट याने अडविला. दोन्ही संघाकडून संयमी, पण तितकाच चतुर खेळ होत होता. मुंबईचा गोली सुब्रता पॉल आण िदिल्लीचा हाउट हेही आपापल्या संघासाठी साजेसे योगदान देत होतेच. अॅण्ड्रू मॉरित्ङयाने दिल्लीच्या खेळाडूंना चकवत चेंडूत पेनल्टी एरियात घेउन आला आण िनिकोलस अनेल्काकडे तो सोपवला. अनेल्काने तो सुभाष सिंघम सिंह याच्याकडे सोपवून चुक केली. सुभाषला चालून आलेल्या संधीचा फायदा उचलता आला नाही. मध्यांतरापर्यंत सामना गोलशुन्य राहिला.मध्यांरानंतर सामन्यातील आक्र मकता वाढली. ५८व्या मिनिटाला दिल्लीच्या खेळाडूंना चकवत डाव्या बाजूने सुभाष चेंडू गोलपोस्ट समीप घेउन आला. दिल्लीचा गोली हाउट पुढे आलेला दिसताच त्याने तत्परतेने चेंडू अनेल्काकडे पास केला. येथे दिल्लीच्या फॉरवर्डला अपयश आले आण िमुंबईचा पिहला गोल झाला.
विजयाची ही घडी अशीच राहुदे !
By admin | Updated: November 6, 2014 00:44 IST