शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

आॅस्ट्रेलियन मीडियाचे वॉटसन, हॅडिनवर टीकास्त्र

By admin | Updated: July 13, 2015 00:35 IST

इंग्लंडकडून अ‍ॅशेजच्या पहिल्या कसोटी सामन्यात सपाटून मार खाल्ल्यानंतर आॅस्ट्रेलियाच्या मीडियाने संघाचे अनुभवी खेळाडू शेन वॉटसन आणि ब्रॅड हॅडिन यांच्यावर टीकास्त्र सोडले.

कार्डिफ : इंग्लंडकडून अ‍ॅशेजच्या पहिल्या कसोटी सामन्यात सपाटून मार खाल्ल्यानंतर आॅस्ट्रेलियाच्या मीडियाने संघाचे अनुभवी खेळाडू शेन वॉटसन आणि ब्रॅड हॅडिन यांच्यावर टीकास्त्र सोडले.यजमान इंग्लंडने गत अ‍ॅशेज चॅम्पियन आॅस्ट्रेलियावर पहिल्या अ‍ॅशेज कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी शनिवारी अंतिम सत्रात १६९ धावांनी दणदणीत विजय मिळवताना पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.विजयासाठी ४१२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चहापानानंतर आॅस्ट्रेलियाचा डाव २४२ धावांत आटोपला आणि त्यांना मानहानिकारक पराभवाचा सामना करावा लागला. आॅस्ट्रेलियन मीडियाने गुरुवारी सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात संघात बदल करण्याची मागणी केली आहे.मीडियाने टीका करताना लिहिले, ‘‘संघातील काही स्टार फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीनंतर वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क याच्या गुडघेदुखीमुळे दुसऱ्या कसोटीत संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे, तसेच वॉटसनची चांगली वेळ आता पूर्ण झाली आहे आणि त्याने त्याचा आत्मविश्वास गमावला आहे. तो योग्य पद्धतीने फलंदाजी करूशकत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे.’’इंग्लंडच्या पहिल्या डावात शानदार शतक ठोकणाऱ्या ज्यो रुट याचा झेल सोडणाऱ्या यष्टिरक्षक ब्रॅड हॅडिन याच्यावरही मीडियाने जोरदार टीका केली आहे. हॅडिनला झेल घेण्याविषयी योग्य अंदाज येत नसल्याचे मीडियाने म्हटले आहे. ज्यो रुट याच्या शतकानंतर इंग्लंडने पहिल्या डावात महत्त्वपूर्ण आघाडी घेऊन आॅस्ट्रेलियावर दबाव वाढवला होता. मीडियात होत असलेल्या या टीकेनंतर वॉटसन आणि हॅडिनवर दुसऱ्या कसोटी संघात आपले स्थान सुरक्षित ठेवण्यासाठी दबाव वाढला आहे. (वृत्तसंस्था)