शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
8
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
9
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
10
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
11
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
12
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
13
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
14
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
15
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
16
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
17
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
18
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
19
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
20
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल

वॉटलिंगचे शतक न्यूझीलंड ६/३३८

By admin | Updated: June 1, 2015 01:48 IST

बी.जे. वॉटलिंगच्या (१00*) तडाखेबंद नाबाद शतकाच्या जोरावर न्यूझिलंडने इंग्लडला जोरदार प्रत्यत्तुर दिले. दिवसभराचा खेळ संपला

लीड्स : बी.जे. वॉटलिंगच्या (१00*) तडाखेबंद नाबाद शतकाच्या जोरावर न्यूझिलंडने इंग्लडला जोरदार प्रत्यत्तुर दिले. दिवसभराचा खेळ संपला तेंव्हा न्यूझिलंडने ६ बाद ३३८ धावा केल्या होत्या. वॉटलिंग १०० धावांतर तर मार्क क्रेग पंधरा धावांवर खेळत होते.तत्पुर्वी, पहिल्या डावात इंग्लडने स्टुअर्ट ब्रॉडच्या ४६ धावांच्या खेळीमुळे न्यूझीलंडप्रमाणेच ३५० धावापर्यंत मजल मारली. त्यानंतर त्यांनी न्यूझीलंडला दुसऱ्या डावात २ बाद २३ अशा संकटात आणले होते. मात्र वॉटलिंगने शतक झळकावत इंग्लडला जोरदार उत्तर दिले.मार्टिन गुप्टिल (७०) आणि रॉस टेलर (४८) यांनी तिसऱ्या गड्यासाठी ८७ चेंडूंत ९९ धावांची भागीदारी केली. या जोडीने न्यूझीलंडला सावरले. डरहमचा जलदगती गोलंदाज वूड याने गुप्टिल आणि टेलर या दोघांनाही पाच षटकांच्या आत बाद करीतमोठा धक्का दिला. न्यूझीलंडची चहापानापर्यंत ४ बाद १४३ धावा अशी अवस्था होती. त्यानंतर ब्रॅँडन मॅक्युलम व बीजे वाटलिंग यांनी डावाची सुत्रे हाती घेतली. मॅक्युलमने ९८ चेंडूत १ षटकार व तीन चौकारांच्या साह्याने ५५ धावा केल्या. वूडच्या चेंडूवर मॅक्यूलम पायचित झाला. मॅक्युलमच्या जागी आलेल्या रॉंचीने वाटलिंगला चांगलीच साथ दिली. एका बाजूने टिच्चून फलंदाजी करत असलेल्या वाटलिंगने १३६ चेंडूत नाबाद १00 धावा केल्या. रॉंची ३१ धावा काढून बाद झाला.लॉर्डसमध्ये पहिला कसोटी सामना १२४ धावांनी गमावल्यानंतर न्यूझीलंडला दोन कसोटी सामन्यांची मालिका ड्रॉ करण्यासाठी हा सामना जिंकावा लागेल.