शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

वेस्ट इंडिज बोर्ड एकादशची सावध सुरुवात

By admin | Updated: July 10, 2016 22:44 IST

वेस्ट इंडिज बोर्ड एकादश संघाने दोनदिवसीय सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताविरुध्द विश्रांतीपर्यंत एक बाद ६७ धावा काढल्या.

सराव सामना : विश्रांतीला १ बाद ६७ धावांची मजलबासेटेर : वेस्ट इंडिज बोर्ड एकादश संघाने दोनदिवसीय सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताविरुध्द विश्रांतीपर्यंत एक बाद ६७ धावा काढल्या. भारताने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद २५८ धावांवर पहिला डाव घोषित केला होता. या धावसंख्येचा पाठलाग करताना विंडिज एकादशने धावफलाकवर ७ धावा लागलेल्या असतानाच लिओन जॉन्सनच्या (२) रुपाने पहिला बळी गमावला. यानंतर सलामी फलंदाज राजेंद्र चंद्रिका (नाबाद ३५) आणि शाइ होप (नाबाद ३०) यांच्या नाबाद ६४ धावांच्या जोरावर विंडिज अध्यक्षीय संघाने आपला डाव सावरला. भुवनेश्वर कुमारने भारताला पहिले यश मिळवून देताना जॉन्सनला धवनकरवी झेलबाद केले. चंद्रिकाने ८३ चेंडूत ६ चौकार मारले असून होपने ८५ चेंडूत ४ चौकार लगावले आहेत. तत्पूर्वी, शिखर धवन (५१), लोकेश राहुल (५०) आणि रोहित शर्मा (नाबाद ५४) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने पहिल्या दिवसअखेर ६ बाद २५८ धावांची मजल मारली. कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारतीयांनी शानदार खेळी केली. राहुलने ९९ चेंडूत ५ चौकार व १ षटकारांसह ५० धावा केल्या. डावखुरा सलामीवीर धवनने ७ चौकारांच्या मदतीने ५१ धावा केल्या. यानंतर रोहित शर्माने १०९ चेंडूंना सामोरे जाताना ८ चौकार व १ षटकाराच्या मदतीने नाबाद ५४ धावांची खेळी केली. कर्णधार कोहली (१४) आणि अजिंक्य रहाणे (५) अपयशी ठरले. चेतेश्वर पुजाराने ३४ धावांचे उपयुक्त योगदान दिले. शिखर व लोकेश यांनी वॉर्नर पार्कच्या संथ खेळपट्टीवर सावध सुरुवात केली. वेगवान गोलंदाजांचा मारा सावधपणे खेळणाऱ्या या जोडीने फिरकीपटूंविरुद्ध आक्रमक पवित्रा स्वीकारला. दोघांनी ९३ धावांची सलामी दिली. शिखर व लोकेश निवृत्त झाल्यानंतर पुजाराने सूत्रे स्वीकारली. विराट (१४) व रहाणे (५) यांना विंडीजचा वेगवान गोलंदाज जोमेल वॅरिकनने तंबूचा मार्ग दाखवला. त्यानंतर पुजारा (३४) निवृत्त झाला. रिद्धिमान साहा (२२) डॅमियन जेकबचे लक्ष्य ठरला.