शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

वॉर्नरच्या शतकाने आॅस्ट्रेलिया मजबूत

By admin | Updated: December 29, 2016 01:15 IST

पाकिस्तानच्या अज़हर अलीच्या द्विशतकानंतर डेविड वॉर्नरच्या शानदार शतकाने आॅस्ट्रेलियाने बॉक्सिंग डे कसोटीत तिसऱ्या दिवशी आव्हान कायम ठेवले आहे. सलामीवीर

मेलबर्न : पाकिस्तानच्या अज़हर अलीच्या द्विशतकानंतर डेविड वॉर्नरच्या शानदार शतकाने आॅस्ट्रेलियाने बॉक्सिंग डे कसोटीत तिसऱ्या दिवशी आव्हान कायम ठेवले आहे. सलामीवीर वॉर्नरने (१४४) उस्मान ख्वाजा (९५) सोबत १९८ धावांची भागीदारी करत पाकिस्तानी गोलंदाजीचे कंबरडे मोडले. या दोघांच्या भागीदारीमुळे दिवसाअखेर आॅस्ट्रेलियाने दोन बाद २७८ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली.पाकिस्तानच्या अज़हर अली याने नाबाद २०५ धावा केल्या. आॅस्ट्रेलियात पाकिस्तानी फलंदाजाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याने माजीद खान यांचा ४४ वर्षे जुना १५८ धावांचा विक्रम मागे टाकला. तर मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर कोणत्याही विदेशी फलंदाजाने केलेल्या सर्वोच्च धावसंख्येच्या विक्रमापासून तो फक्त तीन धावांनी मागे राहिला. मिसबाह उल हक याने ४४३ धावांवर डाव घोषित केला. या मैदानावर विदेशी फलंदाजाची सर्वाधिक धावसंख्या व्हिव रिचर्डस् यांनी नोंदवली होती त्यांनी २०८ धावा केल्या होत्या. अज़हर अली याने दहा तास फलंदाजी केली. त्याने ३६४ चेंडूंचा सामना करताना २० चौकार लगावले. आॅस्ट्रेलिया संघ १६५ धावांनी मागे आहे. तर आठ गडी अजून शिल्लक आहेत. दिवसाचा खेळ संपला तेव्हा कर्णधार स्मिथ १० तर ख्वाजा ९५ धावांवर नाबाद होते. (वृत्तसंस्था)- वॉर्नरने एमसीजीवर बॉक्सिंग डे कसोटीत आपले पहिले तर एकुण १७ वे शतक केले. वॉर्नर ८१ धावांवर असताना त्याला जीवदान मिळाले. वहाब रियाजच्या चेंडूवर तो बाद झाला होता. मात्र वहाबचा पाय क्रीज बाहेर पडल्याने तो नो बॉल ठरला. यानंतर १४४ धावांवर यष्टीरक्षक सर्फराजने त्याचा झेल घेतला. पंचानी बादचे अपिल फेटाळले. पाकनने या निर्णयाला आव्हान दिले. तिसऱ्या पंचांनी वॉर्नर बाद असल्याचा निर्णय दिला.संक्षिप्त धावफलक : पहिला डाव पाकिस्तान - ४४३/९ (अजहर अली २०५, असद अशीक ५०, मोहम्मद आमीर २९, वहाब रियाज ६५, गोलंदाजी - जोश हेझलवुड ३/५०, जॅकसन बर्ड ३/११३, नॅथन लायन १/११५, मिशेल स्टार्क १/१२५), आॅस्ट्रेलिया २७८/२ (डेविड वॉर्नर १४४, उस्मान ख्वाजा खेळत आहे ९५, उस्मान ख्वाजा १०)