शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वॉर्नरच्या शतकाने भारतावर दबाव

By admin | Updated: January 7, 2015 01:41 IST

आॅस्ट्रेलियाने चौथ्या कसोटीत पहिल्याच दिवशी २ बाद ३४८ धावांचा डोंगर उभा करून भारतावर दबाव निर्माण केला आहे.

सिडनी : डेव्हिड वॉर्नरचे शतक आणि सलामीच्या अन्य फलंदाजांनी केलेल्या दमदार कामगिरीच्या बळावर आॅस्ट्रेलियाने चौथ्या कसोटीत पहिल्याच दिवशी २ बाद ३४८ धावांचा डोंगर उभा करून भारतावर दबाव निर्माण केला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या वॉर्नर (१०१) आणि ख्रिस रॉजर्स (९५) यांनी पहिल्या विकेटसाठी केलेल्या २०० धावांच्या भागीदारीच्या बळावर पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजांच्या उणिवा उघड्यावर पाडल्या. दोन्ही सलामीवीर एकामागोमाग तंबूत परतल्यानंतर कर्णधार स्टिवन स्मिथ (८२*) आणि शेन वॉटसन (६१*) यांनी तिसऱ्या विकेटसाठी १४४ धावांची भागीदारी करून भारतासमोरील अडचणी वाढवल्या.प्रथम फलंदाजीला आलेल्या वॉर्नर आणि रॉजर्स या जोडीने आॅस्ट्रेलियाला मजबूत सुरुवात करून दिली. १९ धावांवर असताना रॉजर्सला लोकेश राहुल याने दिलेले जीवदान भारताला महागात पडले. वॉर्नरनेही सामन्यावर वर्चस्व गाजवत कारकिर्दीतले १२वे शतक पूर्ण केले. रॉजर्सला मात्र पाच धावांनी शतकाने हुलकावणी दिली. वॉर्नरने ११४ चेंडूंत १६ चौकारांसह १०८ धावा, तर रॉजर्सने १६० चेंडूंत १३ चौकारांसह ९५ धावा केल्या. त्यानंतर कर्णधार स्टिवन स्मिथ आणि शेन वॉटसन यांनी संघाचा डाव सांभाळला. कोहलीने गोलंदाजीत बदल करीत स्मिथ आणि वॉटसन या जोडीला बाद करण्याचे अनेक प्रयत्न केले, परंतु ते अपयशी ठरले. या दोघांनी संघाला २ बाद ३४८ धावांचा पल्ला गाठून दिला. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलकआॅस्ट्रेलिया : रॉजर्स त्रि. गो. शमी ९५, वॉर्नर झे. विजय गो. अश्विन १०१, वॉटसन नाबाद ६१, स्मिथ नाबाद ८२. अवांतर - ९; एकूण - ९० षटकांत २ बाद ३४८ धावा. गोलंदाजी - भुवनेश्वर २०-२-६७-०, उमेश १६-१-९७-०, मोहम्मद शमी १६-२-५८-१, अश्विन २८-५-८८-१, रैना १०-२-३५-०.