शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

वॉर्नर विरुद्ध गंभीर

By admin | Updated: April 30, 2017 15:08 IST

थोड्याच वेळात केकेआर विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना सुरू होत आहे.

आॅनलाइन लोकमत डेक्कन, दि. 30 - थोड्याच वेळात केकेआर विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना सुरू होत आहे. मात्र हा सामना या दोन संघांपेक्षा गौतम गंभीर विरुद्ध डेव्हिड वॉर्नर असाच राहील. केकेआर आणि सनरायजर्स हे दोनही संघ तुल्यबळ आहे. वॉर्नर, मॅकक्युलम यांच्याकडे फिरत असलेली आॅरेंज कॅप गंभीरने आपल्याकडे खेचून घेतली. वॉर्नर दुसऱ्या स्थानावर असला तरी तो गंभीरपेक्षा ४५ धावांनी मागे आहे. ही आॅरेंज कॅप त्याच्याकडून खेचून घेण्यासाठी वॉर्नर उत्सुक असेल. मात्र त्यासोबतच त्याला आव्हान आहे ते स्पर्धेत ३३१ धावा करणाऱ्या रॉबिन उथप्पाचे. उथप्पा सध्या सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. केकेआरची फलंदाजी मजबूत आहे. केकेआरला सापडलेला सर्वात महत्त्वाचा मोहरा म्हणजे सुनील नरेन, गेल्या सिझनपर्यंत केकेआरचा मुख्य गोलंदाज असलेला नरेन आता संघाचा सर्वात महत्त्वाचा फलंदाज ठरला आहे. सलामीला येऊन तो प्रतिस्पर्धी संघाची पिसे काढतो. त्यासोबत रॉबिन उथप्पाला सापडलेला सूर ही केकेआरची जमेची बाजू आहे. तर मनीष पांडे आणि युसुफ पठाणही कोणताही सामना फिरवण्याची क्षमता आहे. नॅथन कुल्टर नाईल सध्या केकेआरच्या गोलंदाजीची धुरा सांभाळतो आहे. गौतम गंभीर आपल्या आक्रमक नेतृत्वामुळे संघात एक उर्जा निर्माण करत आहे. त्यामुळे केकेआरची कामगिरी सातत्याने चांगली होत आहे. क्षेत्ररक्षणातही केकेआर करत असलेले नवनवे प्रयोग त्यांच्यासाठी फायदेशीर ठरत आहेत. सनरायजर्स संघ १५ एप्रिल रोजी कोलकात्यामध्ये यापूर्वीच्या लढतीत पत्कराव्या लागलेल्या पराभवाचा हिशेब चुकता करण्यास प्रयत्नशील आहे. त्या लढतीत १७३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायजर्सला १७ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर सनरायजर्स संघाच्या कामगिरीत सुधारणा झाली आहे. कर्णधार डेव्हिड वॉर्नर, सलामीवीर शिखर धवन व केन विल्यम्सन यांना सूर गवसला आहे.शिखर धवन धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिल्या पाचात आहे. सनरायजर्सची गोलंदाजी ही आयपीएलमधील सर्वोत्तमम गोलंदाजी मानली जाते. त्याचे मुख्य कारण आहे भुवनेश्वर कुमार त्याने आतापर्यंत ८ सामन्यात १८ बळी घेतले आहेत. तर युवा राशिद खान देखील केकेआरसाठी धोकादायक ठरु शकतो. राशिद खानने देखील ८ सामन्यात ८ गडी बाद केले आहेत.