शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

वॉर्नरच्या वादळात कोलकात्याचा धुव्वा!

By admin | Updated: May 1, 2017 00:52 IST

डेव्हिड वॉर्नरच्या वादळी शतकीसमोर आज जबदरस्त फॉर्मममध्ये असलेल्या कोलकाता नाइटरायडर्सचा धुव्वा उडाला.

ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 1 - डेव्हिड वॉर्नरच्या वादळी शतकासमोर आज जबदरस्त फॉर्मममध्ये असलेल्या कोलकाता नाइटरायडर्सचा धुव्वा उडाला.  हैदराबादने दिलेल्या 210 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाता नाइटरायडर्सला 48 धावांनी पराभव पत्करावा लागला. 
मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याला चांगली सुरुवात मिळाली नाही. नारायण केवळ एक धाव काढून बाद झाला. तर कर्णधार गौतम गंभीर 11 धावा काढून डग आउटमध्ये परतला. दोन खंदे फलंदाज बाद झाल्याने नाइटरायडर्सची फलंदाजी कोलमडली. दरम्यान, सामन्यात पावसाचा व्यत्ययही आला.
 पाऊस थांबल्यानंतर रॉबिन उथप्पाने फटकेबाजी करत सामन्यात रंगत आणली. पण मनीष पांडे 39 आणि  उथप्पा 53 धावा काढून बाद झाल्यानंतर कोलकात्याचा प्रतिकार संपुष्टात आला. अखेर त्यांना 20 षटकात 7 बाद 161 धावांपर्यंतच मजल मारता आली नाही. 
तत्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय कोलकाता नाइटरायडर्सच्या अंगाशी आला. डेव्हिड वॉर्नरने तुफानी फटकेबाजी करत कोलकात्याचा गोलंदाजांची धुलाई केली. 129 धावांची शानदार शतकी खेळी करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरने शिखर धवनसोबत शतकी सलामी देत हैदराबादला भक्कम पायाभरणी करून दिली. 
दरम्यान धवन 29 धावा काढून बाद झाला. त्यानंतर वॉर्नरही 59 चेंडूत 129 धावा काढून बाद झाला. वॉर्नरने या खेळीत 10 चौकार आणि 8 षटकार ठोकले. अखेरच्या काही षटकांमध्ये हैदराबादला म्हणावी तशी फटकेबाजी करता आली नाही. विल्यम्सन (40) आणि युवराज सिंग (नाबाद 6) यांना फारशी मोकळीक न मिळाल्याने हैदराबादला 20 षटकात 3 बाद 209 धावाच करता आल्या.