शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

‘आणखी चांगली कामगिरी करायचीय’

By admin | Updated: July 1, 2017 02:12 IST

जबरदस्त सूर गवसलेली भारताची सलामीची फलंदाज स्मृती मानधना आणखी धावांची भुकेली असून, आपली ही सुरेख लय विश्वचषकातील उर्वरित सामन्यात कायम ठेवण्याची तिची इच्छा आहे.

टॉन्टन : जबरदस्त सूर गवसलेली भारताची सलामीची फलंदाज स्मृती मानधना आणखी धावांची भुकेली असून, आपली ही सुरेख लय विश्वचषकातील उर्वरित सामन्यात कायम ठेवण्याची तिची इच्छा आहे.विशेष म्हणजे डाव्या गुडघ्यावरील दुखापतीनंतर ती जानेवारीपासून एकही सामना खेळली नव्हती. तरीदेखील निवड समितीने या स्पर्धेसाठी स्मृती हिची निवड करून मोठा जुगार खेळला होता. स्पर्धेच्या पहिल्या सराव सामन्यादरम्यान स्मृती लयीत दिसली नव्हती; परंतु वर्ल्डकपच्या पहिल्या दोन सामन्यांत इंग्लंडविरुद्ध ९0 आणि वेस्ट इंडीजविरुद्ध १0६ धावांची खेळी करताना तिने निवड समितीचा विश्वास सार्थ ठरवला.महिला बिग बॅश लीगच्या २0१६-१७ या हंगामात ब्रिस्बेन हिटकडून खेळणाऱ्या स्मृतीने म्हटले, ‘अद्याप स्पर्धा संपलेली नाही; परंतु दुखापतीनंतर चांगले पुनरागमन केल्याने मी आनंदित आहे. इंग्लंडविरुद्ध पहिल्या सराव सामन्यादरम्यान मला सूर गवसला नव्हता आणि मी खूप नर्व्हस होती. सराव सामन्यात वेस्ट इंडीजविरुद्ध नाबाद ८२ धावांची खेळी केल्यानंतर माझे फलंदाजीतील कौशल्य कायम आहे आणि मी फलंदाजी करू शकते हा आत्मविश्वास मिळाला. दुखापतीनंतर पुनरागमन करणे कठीण होते; परंतु आता मी खुश आहे. भारतासाठी दोन सामन्यांत मी चांगली कामगिरी केली आणि पुढेही अशीच लय कायम राहील, अशी आशा आहे.’ इंग्लंडमधील वातावरण स्मृतीच्या चांगलेच पथ्यावर पडते. येथे तिने २0१४ मध्ये अवघ्या वयाच्या १८ व्या वर्षीच भारताच्या कसोटी विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. ही डावखुरी फलंदाज म्हणाली, ‘मला येथील वातावरण आवडते. मला थंड हवामानात खेळणे आवडते. त्यामुळे मला आतून आनंद मिळतो. ते चांगल्या खेळपट्ट्या तयार करतात. भारतातही मला खेळणे आवडते; परंतु येथे खेळणे जास्त आवडते. मी फक्त माझ्या खेळावर लक्ष केंद्रित करते. येथे टीव्ही नाही आणि लक्ष दुसरीकडे जाण्यासारखे येथे काही नाही. त्यामुळे मला क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यास मदत मिळते.’एखाद्या मोठ्या स्पर्धेच्या सहा महिन्यांपर्यंत मैदानाबाहेर राहणे हा कोणत्याही क्रिकेटपटूसाठी मोठा धक्का मानला जातो; परंतु स्मृतीने या वेळेचा उपयोग आपल्या फायद्यासाठी केला. पाकिस्तानविरुद्ध रविवारी होणाऱ्या सामन्यासंदर्भात ती म्हणाली, ‘मी अजिबात समाधानी नाही. गेली पाच महिने तंदुरुस्त होण्यासाठी मी एवढी मेहनत ९0 अथवा शतक करण्यासाठी घेतली नाही. मी भारतासाठी चांगली कामगिरी करू इच्छिते आणि भारतासाठी वर्ल्डकप जिंकू इच्छिते. मी पाच महिन्यांपासून त्यासाठी प्रयत्न करीत आहे.’